ETV Bharat / state

Amravati crime News : एटीएम फोडून 16 लाख रुपये लंपास करणाऱ्या दोघांना अटक, एक हरियाणा तर दुसरा सापडला बैतुलमध्ये - अमरावती एटीएमची लूट

वरुड तालुक्यातील जरूड येथील एटीएम फो़डून 16 लाख 45 हजार रुपये चोरणाऱ्या टोळीमधील दोन भामट्यांना अटक करण्यात आली आहे.अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेने एटीएम फोडणाऱ्या टोळीतील दोन जणांना हरियाणा आणि बैतूलमध्ये अटक केली आहे.

Two thieves arrested
एटीएम फोडणाऱ्या दोन चोरांना अटक
author img

By

Published : May 20, 2023, 7:14 AM IST

अमरावती: वरुड तालुक्यातील जरूड येथील एटीएम फो़डून 16 लाख 45 हजार रुपये चोरणाऱ्या टोळीमधील दोन भामट्यांना अटक करण्यात आली आहे. अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेने हरियाणा आणि मध्यप्रदेशातील बैतूल येथे जाऊन ही कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या आठवडाभरात या दोघांना अटक केली आहे. दरम्यान या आरोपींना अटक केली त्यावेळी गुन्हे शाखेने चोरट्यांनी वापरलेली कारदेखील जप्त केली आहे.

पाच आरोपींचा सहभाग : कलीराम लक्ष्मण नागले (35 रा. चकोर जि. बैतूल) व कैलाश इंदल पाल (43, रा. बारीच जि. बैतूल) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी एकाला हरियाणा राज्यातील उतावल जि. परवल येथून तर, दुसऱ्या आरोपीला बैतुल येथून अटक करण्यात आली आहे. घटनेमध्ये एकूण 5 आरोपींचा सहभाग होता, असे चौकशीदरम्यान उघड झाले आहे. या पाच आरोपींपैकी दोघांना अटक झाली असून अटकेत असलेल्यांनी इतर तिघांची माहिती दिली आहे. या तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी वेषांतर करून केला तपास : जरूड येथील एसबीआयचे एटीएम 12 मे रोजी पहाटे गॅस कटरचे सहाय्याने कापून त्यातील रोख 16 लाख 45 हजार रुपयांची रक्कम या चोरट्यांनी चोरली. वरूड पोलीस ठाण्यात या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश एलसीबीचे निरिक्षक तपन कोल्हे यांना दिले होती.

मोडस ऑपरेंडी अन् हरियाणा कनेक्शन : जरूडमधील एटीएम ज्या पद्धतीने तोडले, ती मोडस ऑपरेंडी हरियाणातील किंवा गुन्हा करून हरियाणात दडून बसलेल्या आरोपींची असल्याचे कोल्हे यांच्या लक्षात आले. त्यानुसार, एक पथक हरियाणात पाठविण्यात आले. त्या पथकाने वेषांतर करून चोरट्याचा शोध सुरु केला. चार ते पाच दिवस शोध घेतल्यानंतर हरियाणातील उतावल येथून एका आरोपीला अटक करण्यात आली. एलसीबीचे पथकाने त्या आरोपीला शुक्रवारी अमरावतीत आणले. तर दुसऱ्या आरोपीला एलससीबीच्या दुसऱ्या पथकाने बैतूलमधून अटक केली.

असा झाला उलगडा : गुन्ह्यात वापरलेली कार दोन दिवसांपूर्वी बैतूल येथे, तसेच घटनेच्या दिवशी वरुड शहरामध्ये फिरत होती. हीच कार चोरट्याचा शोध घेण्यास पुरक ठरली. पोलिसांनी या कारचा सुगावा घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात कार पोलिसांच्या नजरेत आली. त्या कारचा मागोवा घेत घेत पोलिसांचे पथक हरियाणा आणि बैतूलमध्ये पोहोचले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली विना क्रमांकाची लाल कार जप्त करण्यात आली. या चोरट्यांना पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, नितीन चुलपार, अंबक मनोहर, संतोष मुंदाणे, रविन्द्र बावणे, बळवंत दाभणे, सुनिल महात्मे, शेख अजमत अमोल केन्द्रे, निलेश डांगोरे, युवराज मानमोटे, रवि व-हाडे, सागर नाचे, हर्षद घुसे, प्रमोद शिरसाट, राजेश सरकटे यांचा सहभाग होता.

हेही वाचा-

  1. Minor Girls Obscene Photo: जुगारात मोबाईल हरला अन 'त्याचे' घृणास्पद कृत्य आले समोर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
  2. Chhatrapati Sambhajinagar Crime News: मुलीची हत्या करून दाम्पत्याने केली आत्महत्या; कारण मात्र अस्पष्ट
  3. Pune Crime : 5 कोटींची खंडणी मागणाऱ्या खंडणीखोर तोतया पत्रकारांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.