अमरावती - तलवारी विकण्याचा व्यवसाय करणाऱ्याचा गाडगेनगर पोलिसांनी भंडाफोड केला. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी तब्बल 21 तलवारीसह एक शॉटगन जप्त केली असून 5 आरोपींना अटक केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर धारधार तलवारी जप्त करण्यात आल्याने अमरावती शहारात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पाच आरोपींना अटक -
शोभानगरात राहणारा अक्षय इंगळे (30) याच्या घरात तलवारी असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून अक्षयच्या घरातून काही तलवारी जप्त केल्या. अक्षयकडे या संदर्भात चौकशी केली असता, त्याने तलवारी विकण्याकरिता आणल्या असल्याची माहिती दिली. तसेच आतापर्यंत विकलेल्या तलवारी पोलिसांनी जप्त करत एकूण पाच आरोपींना अटक केली. अक्षय हा ऑनलाइन साईटवरून तलवारी बोलावून विकण्याचा व्यवसाय करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - राज्यात भरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षा 1 एप्रिल नंतर घ्या; विनायक मेटेंची मागणी