ETV Bharat / state

Amravati to Ajmer by cycle : ख्वाजाच्या दर्शनासाठी बारा दिवसांची सायकलवारी, 22 वर्षांपासून अनोखा प्रवास - Amravati news

अमरावती शहरापासून साडेनऊशे किलोमीटर लांब असणाऱ्या राजस्थानातील अजमेरमध्ये ख्वाजांच्या दर्शनासाठी येथील हैदरपुरा परिसरात राहणारे 63 वर्षाचे शेख मुसा, शेख इशाक हे चक्क सायकलने निघाले आहे. त्यांच्या या सायकलवारीचे हे 22वे वर्ष असून त्यांचा हा अनोखा प्रवास त्यांच्या आयुष्यात नवी ऊर्जा निर्माण करणारा आहे.

Amravati news
ख्वाजाच्या दर्शनासाठी बारा दिवसांची सायकलवारी
author img

By

Published : Jan 16, 2023, 5:09 PM IST

Updated : Jan 16, 2023, 6:22 PM IST

ख्वाजाच्या दर्शनासाठी बारा दिवसांची सायकलवारी

अमरावती : अमरावतीच्या हैदरपुरा परिसरात वेल्डिंग काम करणारे शेख मुसा शेख इशाक यांचा अमरावती ते अजमेर हा प्रवास बारा दिवसांचा आहे. आता 12 जानेवारीला ते अमरावती येथून आपल्या सायकलने निघाले. 12 तारखेच्या रात्रीचा मुक्काम त्यांनी अचलपूरला केला. त्यानंतर परतवाडा येथून मेळघाटचा घाट सायकलने चढण्यास सुरुवात केली. हा घाट चढताना 13 तारखेचा मुक्काम सेमाडोह येथे केला.

माणुसकी म्हणून माझी सर्वजण मदत करतात : सेमाडोह येथून सुरू झालेल्या प्रवासानंतर 14 जानेवारीच्या रात्री हरी साल येथे त्यांनी मुक्काम केला. त्यानंतर 15 जानेवारीला ते धारणीकडे निघाले. या प्रवासात इंदूर, बदनावर जावरा निमज मनमाड विजयपूर विजयवाडा गुलाबपुरा नसीराबाद येथे मुक्काम करून पुढे थेट अजमेरला मी पोहोचतो असे शेख मुसा, शेख इशाक या प्रवासादरम्यान 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. आता 22 वर्षात या सर्व गावात मी एकाच ठिकाणी रात्रीच्या मुक्कामी असतो. त्यामुळे येथील लोकांची देखील माझी ओळख झाली आहे. कुठल्याही धर्माचा विचार न करता माणुसकी म्हणून माझी सर्वजण मदत करतात असेदेखील शेख मुसा शेख इसाक यांनी सांगितले.

अशी झाली या प्रवासाची सुरुवात : शेख मुसा यांना दोन मुले सुना आणि नातवंडे आहेत. दोनपैकी एक मुलगा हा वाहन चालक आहे. तर दुसरा मजुरी काम करतो. 22 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 2001 मध्ये मला अचानक वेगळी अशी भीती वाटायला लागली. त्यावेळी आपण अजमेरला जावे ही तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. एक दिवस आपल्याला आता जायचे असे ठामपणे वाटल्यावर मी एक मित्र पकडला आणि थेट सायकलने अजमेरच्या दिशेने निघालो. त्यावेळी मला रस्ता देखील माहिती नव्हता. त्यावेळी अगदी झपाटल्यासारखे आम्ही दोघेही घरून निघालो. रस्त्यात अजमेरचा मार्ग विचारून पुडे जायचो. त्या प्रवासात आम्ही अजमेरला जाऊन पोहोचलो. त्यानंतर 2001 पासून सुरू झालेला हा प्रवास आज देखील कायम आहे. भविष्यात जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझा हा नित्य नियम कायम राहील असे देखील शेख मुसा शेख इशाक म्हणाले.

मेळघाटच्या जंगलात तीन दिवसांचा प्रवास : अमरावती ते अजमेर या साडेनऊशे किलोमीटर अंतराच्या प्रवासादरम्यान शेख मुसा शेख इशाक यांचा मेळघाटाच्या जंगलातून तीन दिवसांचा प्रवास होतो. या प्रवासादरम्यान सेमाडोह कधी हरिसाल तर कधी धारणी येथे त्यांचा मुक्काम असतो. आता 12 जानेवारीला ते घरून निघाल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांची दोन्ही मुले सुना आणि नातवंड मेळघाटातील घटांग या गावात भेटायला आले होते. या प्रवासाचा मला आनंद मिळतो आणि माझे कुटुंब देखील माझ्यासोबत कायम आहे याचा मला अभिमान असल्याचे देखील शेख मुसा शेख इशाक सांगतात. 22 वर्षांच्या या प्रवासात मेळघाटच्या खडतर वाटेत माझी सायकल कधीही खराब झाली नाही असेही शेख मुसा शेख इशाक यांनी सांगितले.

अजमेरच्या वकिलांकडे असतो आठ दिवस मुक्काम : 22 वर्षांच्या या प्रवासात अजमेर येथील सुलतानी कुटुंबीयांशी शेख मुसा शेख इशाक यांची ओळख झाली. 22 वर्षांपूर्वी छोटासा असणारा या कुटुंबातील दशरतुल्ला सुलतानी हा आता राजस्थान उच्च न्यायालयात वकील आहे. सुलतानी मोठ्या आदराने मला त्यांच्या घरी आठ दिवस आधार देतो. असे शेख मुसा शेख इशाक यांनी सांगितले.

सायकल आहे रंगीबेरंगी : अमरावती ते अजमेर या प्रवासासाठी शेख मुसा शेख इशाक वापरत असलेली त्यांची खास सायकल ही रंगीबेरंगी आहे. विविध रेडियमसह सजविलेल्या या सायकलच्या समोरच्या भागात तिरंगा ध्वज लावला आहे. महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि राजस्थान अशा तीन राज्यांचा प्रवास असल्यामुळे पोलीस विभागाद्वारे दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र शेख मुसा यांनी सायकलच्या दर्शनी भागावर लावले आहे. सायकलच्या करिअरवर बॅग आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. घरून निघताना दोन तीन हजार रुपये सोबत घेतलेल्या शेख मुसा शेख इशाक यांचा अमरावती ते अजमेर हा बारा दिवसांचा प्रवास त्यानंतर आठ दिवस अजमेरला मुक्काम आणि परत बारा दिवसांची सायकलवारी हे सर्व ख्वाजांवरील श्रद्धेतूनच घडते आहे असे शेख मुसा शेख इशाक म्हणतात.

हेही वाचा - Ahar Express अमरावतीत आहार एक्सप्रेस: भंगार रेल्वे डब्याला बनवले फाईव्ह स्टार हॉटेल, 24 तास रेस्टॉरंटमुळे खवय्यांची चंगळ

Last Updated : Jan 16, 2023, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.