ETV Bharat / state

Amravati News : लाळीच्या ग्रंथीतून काढली पावभर वजनाची गाठ; 25 वर्षांपासून गालात होती गाठ

अमरावती शहरात नव्यानेच मान्यता मिळालेल्या इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाच्या गालात असणारी दीड पाव वजनाची गाठ तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून काढण्यात आली. कान नाक घसा तज्ञ डॉक्टर नीरज मुरके यांनी किचकट अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.

Amravati News
Amravati News
author img

By

Published : Jun 1, 2023, 5:20 PM IST

Updated : Jun 1, 2023, 5:53 PM IST

रमेश तायडे या रुग्णाची प्रतिक्रिया

अमरावती : जिल्ह्यातील परतवाडा येथील रहिवासी रमेश तायडे यांच्या गालात गत वीस वर्षांपासून गाठ होती. ही गाठ दुखायची नाही मात्र गाल फुगलेला दिसत असल्यामुळे हे विद्रूप वाटायचे. गत पाच सहा वर्षात अनेक डॉक्टरांना ही गाठ दाखवली. काही डॉक्टरांनी ही गाठ काढण्यासाठी चार-पाच शस्त्रक्रिया कराव्या लागतील असे सांगितले. इतक्या शस्त्रक्रिया करायच्या म्हणून भीतीच वाटली मात्र अमरावती शहरातील डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर नीरज मुर्के यांनी एकदाच शस्त्रक्रिया करून ही गाठ सहज काढता येते असा धीर दिल्यावर मी या ठिकाणी शस्त्रक्रिया करून घेतली अशी माहिती राजेंद्र तायडे यांनी ई 'टीव्ही भारत' शी बोलताना दिली.

दोन तास चालली शस्त्रक्रिया : डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील का नाक घसा विभागात खास शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गालावर गाठ असणारे रमेश तायडे हे रुग्ण आले होते. डॉ. नीरज मुरके यांनी त्यांच्या गालाची सखोल तपासणी केल्यावर लाळीमध्ये असणारी गाठ जी. 'प्लेओमोर्फीक अडेनोमा' असल्याचे लक्षात आले. हा अतिशय दुर्धर रोग आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी संमती दिल्यावर आम्ही शस्त्रक्रिया केल्याचे डॉक्टर नीरज मुरके 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. सलग दोन तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत 10 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर एवढ्या आकाराची आणि सुमारे एक पाव वजनाची गाठ रुग्णाच्या गालातून बाहेर काढण्यात आली.

यांचे लाभले सहकार्य : अतिशय किचकट असणारी ही शस्त्रक्रिया करण्यासाठी महाविद्यालयातील एक्स-रे विभागाचे डॉक्टर मनीष राठी, डॉक्टर विकी डॉक्टर सुमेला खान, डॉक्टर शिवानी बेले यांनी अचूक निदान केले. पॅथॉलॉजी विभागातील डॉक्टर गौरव गोहाड,डॉक्टर रूपाली चोरडिया डॉक्टर शलाका वडनेरकर यांनी काम पाहिले. कान नाक घसा विभागातील डॉक्टर नेहा गोंधळेकर यांच्यासह ऑपरेशन थेटर मधील कर्मचाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली असल्याचे डॉक्टर नीरज मुरके म्हणाले.

रुग्णांना सर्व सेवा मोफत : नव्यानेच मान्यता मिळालेल्या इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित डॉक्टर राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांवर पूर्णतः मोफत उपचार केला जातो. विशेष म्हणजे गरीब रुग्णांना त्यांच्या घरून रुग्णालयापर्यंत आणणे आणि उपचार केल्यावर रुग्णालयातून घरी सोडण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी मोफत उपलब्ध असल्याचे डॉ. नीरज मुरके यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र गोडे, प्रमुख संचालक डॉ. दिलीप गोडे, सचिव डॉ. योगेश गोडे यांच्या मार्गदर्शनात हे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णसेवेत भविष्यात विदर्भात सर्वात आघाडीवर असेल असे देखील डॉ. नीरज मुर्के यांनी सांगितले.

Last Updated : Jun 1, 2023, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.