अमरावती - निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे सांगण्यात येते. तर कित्येक वर्षांपासून मतदानापासून वंचित राहिलेल्या तिवसा मतदारसंघातील 30 कुटुंबांनी गुरूवारी पहिल्यांदा मतदान केले.
हेही वाचा - आमदार यशोमती ठाकूर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
तिवसा शहरातील पंचवटी चौकाच्या खुल्या जागेमध्ये 30 आदिवासी कुटुंब गेल्या 25 वर्षापासून वास्तव्य करत आहेत. उदरनिर्वाहसाठी हे आदिवासी लहान-लहान व्यवसाय करतात. तर 25 वर्षापासून येथे वास्तव्य करणाऱ्या नागकरिकांचे कोणत्याही शासकीय कागदपत्रावर नाव नाही. तर त्यांचे मतदान ओळखपत्रही नव्हते. त्यामुळे सर्व कुटुंबे प्रशासनाच्या विविध सवलतीपासून वंचित आहेत.
हेही वाचा - जिल्हा पोलीस अधीक्षक खोटे बोलतायेत; माजी मंत्री हर्षवर्धन देशमुखांचा आरोप
त्यामुळे आदिवासी कुटुंबांनी गुरूवारी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूकीसाठी मतदान केले. तसेच आम्ही भारताचे रहिवाशी आहोत, आम्हाला शासनाच्या विविध योजना देण्यात याव्यात, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.