अमरावती - केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ अमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा येथे तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत तीनशे फूट लांब तिरंग्यासह राष्ट्रवादाचे फलक, शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि भगवा ध्वज उंचावत सुमारे 24 ते 25 हजार लोकांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा - 'असहिष्णुतेच्या मुद्द्यावर योग्य होते आमिर आणि शाहरुख''
परतवाड्यातील नेहरू मैदानावरून आणि अचलपूर येथील गांधीपूल परिसरातून निघालेली ही लक्षवेधक रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहचली. तेथे गजानन कोल्हे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले निवेदन सोपवण्यात आले. सीएएच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीवर परतवाड्यात पुष्पवर्षाव करण्यात आला. रॅलीला पाठिंबा म्हणून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दुपारपर्यंत बंद ठेवली होती.