ETV Bharat / state

बँकेची 'एनईएफटी' प्रणाली ठरत आहे ग्राहकांसाठी डोकेदुखी, व्यापाऱ्याचे अडकले लाख रुपये - bank of maharashtra

एका व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याच्या बँक खात्यावर एनईएफटीद्वारे 99 हजार 900 रुपये पाठवले. पण, ती रक्कम पाठवणाऱ्याच्या बँक खात्यातून वजा झाली पण, दुसऱ्या व्यापाऱ्याच्या बँक खात्यात जमा झाली नाही.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Jan 7, 2020, 11:14 AM IST

अमरावती - एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सहजरित्या पैसे पाठविता यावे, यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (एनईएफटी) ही पैशांच्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरची पद्धत सुरू केली. मात्र, ही प्रणाली ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महाराष्ट्र बँकेतून एचडीएफसी बँकेच्या खात्यामध्ये पाठविलेले 99 हजार 900 रूपये तब्बल 23 दिवसांपासून अडकून पडले असल्यामुळे ग्राहकाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बोलताना व्यापारी व बँकेचे व्यवस्थापक

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत मनोज शिंदे यांचे गिताई इलेक्ट्रीकल्स या फर्मच्या नावाने खाते आहे. त्यांनी या खात्यामधून 13 डिसेंबर रोजी अमरावती येथील एचडीएफसी बँकेत हीना मार्केंटींग नावाच्या खात्यात एनईएफटी प्रणालीव्दारे 99 हजार 900 रुपये ट्रान्सफर केले. मात्र, अनावधाने त्यांच्याकडून खाते क्रमांकाचा एक आकडा कमी लिहिण्यात आला होता. यामुळे त्यांच्या खात्यामधून कमी झालेली ही रक्कम दुसऱ्यांच्या खात्यावर पोहचली नाही. त्यामुळे ती रक्कम त्याचदिवशी मनोज शिंदे यांच्या गिताई ईलेक्ट्रीकल्स नावाच्या खात्यावर परत येणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. त्यांनी वारंवार महाराष्ट्र बँकेत चकरा मारल्या, अमरावती एचडीएफसीमध्येही गेले. परंतु, काहीही उपयोग झाला नाही. 23 दिवसांपासून नेमके पैसे गेले कुठे हे सुध्दा बँकेला माहिती नाही. अशामुळे ग्राहक या प्रणालीमुळे वैतागला असून पैसे परत कधी येणार याची वाट बघत आहे.

हेही वाचा - चिखलदऱ्यात स्ट्रॉबेरीतून भरघोस उत्पादन; पारंपरिक पिकांना फाटा देत नव्या शेतीकडे तरुणाची वाटचाल

या प्रकरणाबाबत शाखेतून तसेच हेड ऑफीसकडून एचडीएफसीच्या एनईएफटी सेलला 15 ते 20 ई-मेल केले. या ई-मेलला एकही रिप्लाय एचडीएफसी बँकेकडून मिळाला नाही. कॉलवर सुध्दा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चांदूर रेल्वेच्या बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक ओमक्रिष्ण भारती यांनी सांगितले. तर बँकेच्या अशा प्रकारामुळे व्यापारी वर्गाची प्रतिष्ठा खराब होत असल्याचे ग्राहक मनोज शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा - प्रेम प्रकरणातून तरुणाने छोटी तलवार भोकसून केली तरुणीची हत्या, स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न

Intro:

अमरावती: चांदूर रेल्वेत एनईएफटी प्रणाली ठरली ग्राहकांसाठी डोकेदुखी

एका ग्राहकाचे ९९ हजार ९०० रूपये २३ दिवसांपासुन अडकले

महाराष्ट्र बँकेतुन एचडीएफसी बँकेच्या खात्यामध्ये पाठविले होते पैसे
-------------–--------------------------------
अमरावती अँकर

एका बँकेतुन दुसऱ्या बँकेत सहजरित्या पैसे पाठविता यावे यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (एनईएफटी) ही पैशांच्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरची पद्धत सुरू केली. मात्र ही प्रणाली ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महाराष्ट्र बँकेतुन एचडीएफसी बँकेच्या खात्यामध्ये पाठविलेले ९९ हजार ९०० रूपये तब्बल २३ दिवसांपासुन मधातच कुठेतरी अडकले असल्यामुळे ग्राहक वैतागला आहे. 

Vo-1
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत मनोज शिंदे यांचे गिताई ईलेक्ट्रीकल्स या फर्मच्या नावाने खाते आहे. त्यांनी या खात्यामधून १३ डिसेंबर रोजी अमरावती येथील एचडीएफसी बँकेत हिना मार्केंटींग नावाच्या खात्यात एनईएफटी प्रणालीव्दारे ९९ हजार ९०० रूपये ट्रान्सफर केले. मात्र अनावधाने त्यांच्याकडून खाता क्रमांकाचा एक आंकडा कमी लिहण्यात आला. यामुळे त्यांच्या खात्यामधून कमी झालेली ही रक्कम दुसऱ्यांच्या खात्यावर पोहचली नाही. त्यामुळे ती रक्कम त्याचदिवशी मनोज शिंदे यांच्या गिताई ईलेक्ट्रीकल्स नावाच्या खात्यावर परत येणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. त्यांनी वारंवार महाराष्ट्र बँकेत चकरा टाकल्या, अमरावती एचडीएफसी मध्ये गेले परंतु काहीही उपयोग झाला नाही. २३ दिवसापासुन नेमके पैसे गेले कुठे हे सुध्दा बँकेला माहिती नाही. अशामुळे ग्राहक या प्रणालीमुळे वैतागला असुन पैसे परत कधी येणार याची वाट बघत आहे.

VO - 2

या प्रकरणाबाबत मी शाखेतुन तसेच आमच्या हेड ऑफीसकडून एचडीएफसीच्या एनईएफटी सेलला १५ ते २० ई मेल केले. या ई मेलचा एकही रिप्लाय एचडीएफसी बँकेकडून मिळाला नाही. कॉलवर सुध्दा प्रतिसाद मिळाला नसल्याचे चांदूर रेल्वेच्या बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक ओमक्रिष्ण भारती यांनी सांगितले.

_(बाईट - शाखा व्यवस्थापक ओमक्रिष्ण भारती)_

VO - 3

बँकेच्या अशा प्रकारामुळे माझी मार्केटींगमधील प्रतिष्ठा खराब होत असल्याचे ग्राहक मनोज शिंदे यांनी सांगितले.  

_(बाईट - मनोज शिंदे, ग्राहक)_

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.