ETV Bharat / state

मोझरीनजीक पोलिसांनी सिनेस्टाईल पकडला 4 लाखांचा जुगार; 16 आरोपींवर गुन्हे दाखल

मोझरीनजीक पोलिसांनी सिनेस्टाईलने जुगार अड्ड्यावर धाड टाकून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

crime
crime
author img

By

Published : Jan 27, 2021, 12:35 AM IST

अमरावती - पडीक असलेल्या एका शेतशिवारात तिवसा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून 16 आरोपींना ताब्यात घेत 4 लाख 2 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे..

प्राप्त माहितीनुसार, तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथील दासटेकडीच्या मागील बाजूला एका शेतशिवारात जुगार खेळल्या जात असल्याची गुप्त माहिती तिवसा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी 12 वाजल्यापासून तिवसा पोलिसांचे पथक जुगार खेळणाऱ्या परिसरात सापळा रचून होते. त्यानंतर दुपारी 5 वाजता अतिशय शिताफीने जुगारस्थळी रेस्क्यू करीत जुगारावर धाड टाकली व घटनास्थलावरून एकूण 16 आरोपींसह 10 मोटर सायकल,मोबाईल व नगदी असा एकूण 4 लाख 2 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

घटनास्थळवरून 4 आरोपी फरार झाले असून एकूण 20 आरोपींवर तिवसा पोलिसांनी जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहे. आरोपीमध्ये तिवसा, माहुली जहागीर, मोझरी येथील जुगाऱ्यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रिता उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शैलेश मस्के, अरविंद गावंडे, मंगेश साव, विशाल करूले, भूषण चंदेल, भूषण नंदरधने, राजेंद्र चव्हाण यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.