अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर येथे एकाच रात्री चोरट्याने तीन मेडिकलची दुकाने फोडून त्यातील मास्क व सॅनिटायझर चोरून नेले आहे. त्याचबरोबर दुकानातील काही पैसे सुद्धा चोरून नेल्याचे उघड झाले. दरम्यान हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
अचलपुरातील प्रवीण एजन्सी, गौरव मेडिकल व कृष्णा मेडिकल येथे बुधवारी रात्री चोरट्याने त्याच्याकडीन साहित्याने मेडिकलचे कुलूप तोडून आत असणाऱ्या ड्रॉव्हरमधील पैसे, मास्क व सॅनिटायझर चोरून नेल्याची घटना घडलेली आहे. आतापर्यंत चोरट्याने सोन्या-चांदीची दुकाने लुटल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. पण, मेडीकल दुकान फोडून मास्क व सॅनिटायझर चोरून नेल्याची पहिलीच घटना घडली आहे. तीनही दुकानांमधून चोरट्याने रोकड देखील लंपास केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट: अमरावतीत ८४ बसेसच्या फेऱ्या रद्द; प्रवाशांची गैरसोय