अमरावती - अमरावती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी योथील लोकांना रस्त्यांचे काम तातडीने केल्या जाईल असे केवळ अनेक वर्षांपासून आश्वासन दिले आहे. ( Amravati Badnera MLA Ravi Rana ) ग्रामस्थांसोबतच विद्यार्थी देखील म्हणत आहेत. मात्र, आश्वासनापलीकडे आमदार रवी राणा हे काहीच करत नसल्यामुळे शाळेतील शिक्षकांसह चिमुकल्यांना मोठी सर्कस करीत शाळा गाठावी लागत आहे.
ग्रामस्थांना गावाबाहेर पडता आले नाही - पेढी नदीच्या पुरामुळे दोन दिवस गावाचा संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे पेढी नदीला पूर आल्याने सावरखेड या गावाला जोडणारा नदीवरील पूल पाण्याखाली बुडाला आणि सावरखेड या गावाचा संपर्क तुटला आहे. सलग दोन दिवस पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे ग्रामस्थांना गावाबाहेर पडता आले नाही. तसेच, या गावात बाहेरच्या व्यक्तींना जाता आलेले नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे, ह्या गावात कुठेही पक्का रस्ता नसल्यामुळे गावातील कच्च्या रस्त्यांवर नुसता चिखल झाला होता.
नदीच्या पुरामुळे शिक्षकांना देखील शाळेत येता आलेले नाही - ग्रामस्थांना या चिखलातून पायी चालणे देखील अशक्य होते. अनेक घरांमध्ये पेढी नदीचे पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबाचे मोठे हाल झाले आहेत. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता सातवीपर्यंत शाळा असून पेढी नदीच्या पुरामुळे शिक्षकांना देखील शाळेत येता आलेले नाही. आता नदीचा पूर ओसरल्यावर शिक्षक देखील चिखल तुडवीतच कसेबसे शाळेत पोहोचले आहेत. सावरखेड या गावात इयत्ता सातवीपर्यंतच शाळा असल्यामुळे इयत्ता आठवीपासून पुढे शिक्षणासाठी गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुंड सर्जापूर येथे गावातील अनेक विद्यार्थी जातात. मात्र, पुरामुळे विद्यार्थ्यांना सलग तीन दिवस शाळेत जाता आले नाही.
पुराचे पाणी थेट गावात शिरले - आता पूर ओसरला असला तरी रस्ता नसल्यामुळे चिखलातून विद्यार्थ्यांना गावाबाहेर शिकण्यासाठी जाण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. पुलाखाली टाकलेले पाईप केले वाहून पेढी नदीला पूर आल्यावर पुराचे पाणी पुलाखालून त्वरित वाहून जावे यासाठी प्रशासनाच्या वतीने पुलाखाली पाईप टाकले होते. मात्र, यावर्षी पहिल्याच पावसात आलेल्या पुरामुळे सावरखेड गावाला जोडणाऱ्या पुलाखालचे पाईप देखील वाहून गेले आहेत. यामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून येणारा कचरा काटेरी वृक्ष पुलाखाली अडकल्यामुळे नदीच्या पुराचे पाणी थेट गावात शिरले आहे.
बारा कोटीच्या रस्त्याला मुहूर्त मिळेना - प्रशासनाने सातत्याने केले दुर्लक्ष सावरखेड गावात दरवर्षी पावसामुळे हा आकार माजतो या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी गावात योग्य नियोजन करावे यासाठी दोन महिन्यापूर्वी जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सावरखेड या गावात यावर्षी पुराचा तडाखा बसणार नाही यासाठी योग्य नियोजन करावे असे निर्देश दिले होते. मात्र सावरखेड गावात प्रशासनाचे कुठलेही अधिकारी किंवा साधा कर्मचारी देखील पोहोचला नसल्याची तक्रार ग्रामस्थ करीत आहे. बारा कोटीच्या रस्त्याला मुहूर्त मिळेना सावरखेड या गावाला जोडणारा अवघा अडीच ते तीन किलोमीटरच्या रस्त्यासाठी एकूण 12 कोटी रुपये तीन वर्षांपासून मंजूर झाले आहेत. मात्र या रस्त्याच्या कामाला अद्यापही मुहूर्त मिळाला नसल्यामुळे यावर्षी देखील पूर परिस्थिती त गावाला जोडणारा रस्ता बंद होतो आहे.
गाव पूर्णतः पाण्यात बुडाले - गावाला जोडणाऱ्या पुलालगतच मुख्य रस्त्याचा मोठा भाग वाहून गेल्यामुळे या ठिकाणी कसेबसे दगड टाकून रस्ता जोडण्यात आला मात्र या दगडांवरून दुचाकी निर्णय देखील कठीण आहे. आमदार रवी राणा गांभीर्याने घेणार का दखल गावात पूर आला की दरवर्षी आमदार रवी राणा पूर परिस्थिती पाहायला येतात. गावाला जोडणारा पूल दुरुस्त करून देऊ गावात रस्ते बांधू असे आश्वासन देतात मात्र गावाची परिस्थिती खत दहा वर्षापासून जैसे थे आहे. आमदार रवी राणा खरोखर गांभीर्याने गावातील महत्त्वाच्या विषयांची दखल घेणार का असा सवाल ग्रामस्थांसोबतच गावातील चिमुकले विद्यार्थी देखील करीत आहेत. 2008 मध्ये पाण्यात बुडाले गाव अतिवृष्टीमुळे 2008 मध्ये सावरखेड गाव पूर्णतः पाण्यात बुडाले होते.
गावांना पुराच्या धोक्याचा इशारा - गावातून वाहणाऱ्या पिढी नदीचे पाणी संपूर्ण गावात शिरल्यामुळे हा हाहाकार उडाला होता. त्यावर्षी गावातील उंचावर असणारा एडवोकेट श्रीकांत खोरगडे यांच्या भव्य भाड्यात ग्रामस्थांनी आश्रय घेतला होता. सलग आठ दिवस गावात भीषण परिस्थिती होती. असे असले तरी आज 14 वर्षानंतर देखील पूर परिस्थितीत बचावासाठी गावात कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. सावरखेड प्रमाणेच लगतच्या कुंड सर्जापूर कुंड खुर्द हातून हातुर्णा का मुंजा या गावांना देखील 2008 मध्ये पुराचा फटका बसला होता आता देखील या सर्व गावांना पुराच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
बारा कोटी रुपयांचा रस्ता मंजूर - पुनर्वसनाच्या नावाखाली गावाचा विकास शून्य सावरखेड सहलगतच्या कुंड सर्जापूर कुंड खुर्द हातून चातुर्णा का मुंजा ही गाव पिढी धरण क्षेत्रात येत असल्यामुळे या गावांचे पुनर्वसन होणार असे जाहीर करण्यात आले होते. मात्र सावरखेड या गावातील केवळ 25% भागच बुडीत क्षेत्रात येत असल्यामुळे संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यास गावातील काही मंडळींनी विरोध केला आहे. जर गावाचे पुनर्वसन झाले तरी ग्रामस्थांची शेती मात्र बुडीत क्षेत्रात येत नसल्यामुळे ती शेती येथेच कायम राहणार आहे. यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मार्ग हवामात्र गावाचे पुनर्वसन होणार या नावाखाली गावात कुठलेही विकास काम केले जात नाही गंभीर बाब म्हणजे ग्रामस्थांना शेतात जाण्यासाठी उपयुक्त ठरणारा बारा कोटी रुपयांचा रस्ता मंजूर असून देखील या रस्त्याचे कामही ठप्प आहे.
हेही वाचा - Monsoon Update Maharashtra : राज्यात येत्या काळात पावसाचा जोर ओसरेल - डॉ. रामचंद्र साबळे