अमरावती - जिल्ह्यातील परतवाडा शहर मागील काही महिन्यांपासून चोरी व दरोड्यांच्या घटनांनी हादरून गेले आहे. त्यानंतर आज एक चोरीची घटना घडली आहे. परतवाडा शहरातील सदर बाजार परिसरात असणाऱ्या ईश्वरदास पन्नालाल अग्रवाल सराफा दुकानामध्ये चोरी झाली. ही घटना रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून तबल 50 ते 60 लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
चोरी करणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. तर मागील काही महिन्यांपूर्वीसुद्धा एका मिल व्यावसायिकाच्या घरी शसस्त्र दरोडा पडला होता. त्यातच आजच्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.