ETV Bharat / state

Statue of Shivaji Maharaj Removed : अखेर मध्यरात्री शिवाजी महाराजांचा पुतळा काढला; राणा दाम्पत्य नजरकैदेत - Rajapeth flyover Amravati

आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. त्यामुळे शहरात मोठे राजकारण तापले होते. मात्र शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात प्रशासनाने मध्यरात्री हा पुतळा तेथून काढला आहे. दरम्यान आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी नजरकैदेत होते.

शिवाजी महाराजांचा पुतळा काढला
शिवाजी महाराजांचा पुतळा काढला
author img

By

Published : Jan 16, 2022, 8:23 AM IST

Updated : Jan 16, 2022, 9:24 AM IST

अमरावती - शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर चार दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी मध्यरात्री कार्यकर्त्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता हा पुतळा बसवला होता. त्यामुळे शहरात मोठे राजकारण तापले होते. मात्र शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात प्रशासनाने मध्यरात्री हा पुतळा तेथून काढला आहे. दरम्यान आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी पहाटे तीन वाजतापासून नजरकैदेत ठेवले आहे. मध्यरात्री पुतळा काढतेवेळी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोपही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मध्यरात्री शिवाजी महाराजांचा पुतळा काढला

राणा यांच्या घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

कुठलीही परवानगी नसताना राजापेठ उड्डाणपुलावर पुतळा बसवत त्याठिकाणी दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी युवा स्वाभिमान आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्त्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. दरम्यान पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात महापालिका प्रशासनाने केलेया कारवाईच्या या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या शंकरनगर घरासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांच्या वतीने घेतली जात आहे.

भाजपाकडून निषेध -

राजापेठ उड्डाणपुलावर स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आल्याच्या प्रकाराबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी ही कारवाई म्हणजे मोगलाई असल्याचे म्हटले आहे. अमरावती शहरात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा दर्शनी भागात पुतळा नाही. तसेच संभाजी महाराजांचाही पुतळा नाही. त्यामुळे राजापेठ उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कारवाई करणे हा प्रकार अतिशय निंदनीय असून आम्ही सरकारचा निषेध नोंदवतो, असेही शिवराय कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

कार्यकर्त्यांनी व्यक्त केला रोष -

महापालिका प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज सकाळी हटविण्यात आल्यामुळे युवा स्वाभिमान च्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. राज्य शासनाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का चालत नाही, असा सवालही यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांचा निषेध युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी नोंदविला.

Last Updated : Jan 16, 2022, 9:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.