ETV Bharat / state

अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली, लॉकडाऊन ठरला फायदेशीर

आमरावतीमध्ये कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदी फायदेशीर ठरली आहे. जिल्ह्यात आणखी खबरदारी घेतली गेली, तर आरावती जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल अशी आकडेवारी आहे.

अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटली, लॉकडाउनचा झाला परिणाम

author img

By

Published : May 20, 2021, 5:31 PM IST

अमरावती - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने फेब्रुवारी महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात थैमान घातले असून, सलग तीन महिन्यांच्या लॉकडाऊनचा परिणाम आता जाणवायला लागला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ओसरायला लागली असून, अमरावतीच्या नागरिकांमध्ये कोरोनामुक्तीची आशा निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात सध्याची परिस्थिती अमरावती जिल्ह्यात सध्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ९ हजात ७१२ इतकी आहे. यापैकी २ हजार ४९ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, अमरावती शहरात १ हजार ८३४ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर, ५ हजार ८२९ रुग्ण ग्रामीण भागात गृहवीलगीकरणात आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.०९ टक्के इतका असून, रुग्ण दुप्पटचा रेट ५४ टक्के आहे. जिल्ह्यात कोरोनमुळे १ हजार ३०३ जण दगावले असून, जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण १.५३ इतका आहे.

कसा आहे कोरोना रुग्णांचा आलेख

अमरावती जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी ३४४ कोरोना रुग्ण आढळून आले होते. ८ एप्रिल ३७८, ९ एप्रिल ४२५, १० एप्रिल ३९८, ११ एप्रिल ४५५, १२ एप्रिल ४१४, १३ एप्रिल ५५२, १४ एप्रिल ६४९, १५ एप्रिल ५३५, १६ एप्रिल ६८०, १७ एप्रिल ७९९, १८ एप्रिल ५९६, १९ एप्रिल ५९३, २० एप्रिल ७००, २१ एप्रिल ५२०, २२ एप्रिल ७३९, २३ एप्रिल ६५२, २४ एप्रिल ७०४, २५ एप्रिल ६८५, २६ एप्रिल ८७९, २७ एप्रिल ८३८, २८ एप्रिल ९४६, २९ एप्रिल ९३४, ३० एप्रिल ९६५ इतके रुग्ण आढळले.

मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजारावर गेला होता. १ मे रोजी ९८० कोरोना रुग्ण आढळले, २ मे रोजी ८०४, ३ मे रोजी ९०३, ४ मे रोजी १ हजार १२३ कोरोना रुग्ण रुग्ण आढळून आलेत. ५ मे रोजी १ हजार १६७, ६ मे रोजी १ हजार १८९, ७ मे रोजी १ हजार १२५, ८ मे रोजी १ हजार २४१, ९ मे रोजी १ हजार १८६, १० मे रोजी १ हजार ५ , ११ मे रोजी १ हजार १६, १२ मे रोजी १०९२, १३ मे रोजी १ हजार १८८, १४ मे रोजी ९२२, १५ मे रोजी १०९७, १६ मे रोजी १ हजार १७५ कोरोना रुग्ण आढळून आलेत. १७ मे रोजी मात्र ८७० रुग्ण आढल्यावर अमरावतीकरांना काहीसा दिलासा भेटला. त्यानंतर १८ मे रोजी ७९८ आणि १९ मे रोजी ७०१ कोरोना रुग्ण आढळून आलेत.आकडा हजाराच्या खाली येताच अमरावतीकर सुखावले कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज हजाराने वाढ होत असताना, अमरावतीकर हादरले होते. मात्र, आता तीन दिवसंपासून ही संख्या हजाराच्या खाली गेल्याने, अमरावतीकर काहीसे सुखावले आहेत.

२२ मे पर्यंत कठोर संचारबंदी

राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाऊन असताना अमरावती जिल्ह्यात ९ मे पासून २२ मे पर्यंत कठोर संचारबंदी लागू आहे. शासकीय कार्यलयेसुद्धा या संचारबंदीत बंद असून, कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी ही संचारबंदी फायदेशीर ठरली आहे. जिल्ह्यात आणखी खबरदारी घेतली गेली, तर आमरावती जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा - मंत्री विजय वडेट्टीवार, रामदास आठवले आज रायगडात

हेही वाचा - सुप्रिया सुळे मला धमकावतात -जयश्री पाटील यांचा गंभीर आरोप, ईडीकडे नोंदवला जबाब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.