ETV Bharat / state

इथं मोफत जेवणाबरोबर केली जाते कोरोनाबधितांच्या आरोग्यासाठी प्रार्थना

कोरोनाबधित रुग्णांची प्रकृती लवकर बरी व्हावी त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी त्यांच्या जेवणात कडधान्य बरोबरच अंड्याचा देखील समावेश केला जातो.

इथं मोफत जेवणाबरोबर केली जाते कोरोनाबधितांच्या आरोग्यासाठी प्रार्थना
इथं मोफत जेवणाबरोबर केली जाते कोरोनाबधितांच्या आरोग्यासाठी प्रार्थना
author img

By

Published : Jun 4, 2021, 9:14 AM IST

Updated : Jun 4, 2021, 12:17 PM IST

अमरावती - शहरातील अनेक खाजगी रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. परिणामी अनेक रुग्णांचे नातेवाईकसुद्धा रुग्णालयात आहेत. परंतू शहरातील हॉटेल बंद असल्यामुळे या रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचे हाल होत आहेत. या गोष्टी दखल घेत संजीवन सोशल डेव्हलपमेंट सोसायटी अशा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एक जीवन रोटी अभियान सुरू केले आहे. शहरातील अनेक खाजगी कोविड रुग्णालयातील गरजवंत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सकाळ संध्याकाळ १२० ते १५० डबे मोफत जेवण पुरवण्याच काम हे मागील दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. एवढचं नाही तर मोफत जेवणासोबत रुग्णांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली जाते.

मोफत जेवणाबरोबर केली जाते कोरोनाबधितांच्या आरोग्यासाठी प्रार्थना

मागील वर्षी सुरवातीला जेव्हा पहिले कडक लॉकडाऊन लागले होते. तेव्हा महामार्गाने जाणाऱ्या हजारो मजुरांना संजीवन सोशल डेव्हलपमेंट सोसायटीने मोफत जेवण पुरवले होते. त्यानंतर आता पुन्हा दूसरी लाट आल्याने तरुणांनी आपले किचन पुन्हा सुरू केले आहे. त्यासाठी या तरुणांनी खाजगी रुग्णालयात बॅनर लावले आहेत. जे गरजवंत नातेवाईक त्यांना फोन करतील, अशाच लोकांना ते जेवनाचा डबा पुरवत असतात.

रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी जेवणाच्या डब्यावर वाक्य
कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असताना ते रुग्णालयात एकटे असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. त्यात अनेकजण हार मानत असतात. परंतू अशा रुग्णांना आधार देण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी जेवणाच्या डब्यावर काही सकारात्मक वाक्य देखील लिहले आहे.

जेवणात कडधान्य व अंड्याचा समावेश
कोरोनाबधित रुग्णांची प्रकृती लवकर बरी व्हावी त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी त्यांच्या जेवणात कडधान्य बरोबरच अंड्याचा देखील समावेश केला जातो. संजीवनी शोषल डेव्हलपमेंट सोसायटीला अनेकजण मदत करत असल्याचे या तरुणांनी सांगितले.

Last Updated : Jun 4, 2021, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.