ETV Bharat / state

अंगणातील विहिरीत आढळला 'त्या' बेपत्ता गतिमंद चिमुकलीचा मृतदेह

सुप्रिया श्याम काबरा ही सात वर्षाची गतिमंद मुलगी रविवारी घरातून बेपत्ता झाली होती. या चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी दुपारी तिच्या घराच्या आवारातील विहिरीत आढळला आहे. सुप्रिया आपोआप विहिरीत पडली की हा घतपाताचा प्रकार आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

'त्या' मतिमंद चिमुकलीचा मृतदेह अंगणातील विहिरीत आढळला
author img

By

Published : Jul 10, 2019, 11:18 AM IST

अमरावती- सुप्रिया श्याम काबरा ही सात वर्षाची गतिमंद मुलगी रविवारी घरातून बेपत्ता झाली होती. या चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी दुपारी तिच्या घराच्या आवारातील विहिरीत आढळला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

'त्या' गतिमंद चिमुकलीचा मृतदेह अंगणातील विहिरीत आढळला

चांदूरबाजार येथील मूळ रहिवासी असणाऱ्या प्रीती काबरा आपल्या दोन गतिमंद मुलींसह रविवारी ख्रिस्त कॉलनी परिसरात क्षीरसागर यांच्या घरात भाड्याने राहायला आल्या होत्या. रविवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून चिमुकली सुप्रिया दिसेनाशी झाल्याने प्रीती काबरा आणि त्यांच्या आई-वडिलांनी सुप्रियाचा परिसरात शोध घेतला. व्यवस्थित चालता येत नाही, बोलताही येत नसलेली सुप्रियाचा शोध ख्रिस्त कॉलनी परिसरातील युवकांनी रविवारी रात्रभर घेतला. याबाबत गाडगेनगर पोलिसात तक्रारही देण्यात आली होती. पोलिसांनी प्रीती काबरा यांच्या चांदूरबाजार आणि धामणगाव रेल्वे येथील सर्व नातेवाईकांची चौकशीही सुरू केली होती.

दरम्यान मंगळवारी दुपारी अंगणातील विहिरीतून दुर्गंध येऊ लागल्याने घरमालकांनी विहिरीत डोकावले असता, सुप्रियाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने विहिरीतून बाहेर काढलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला आहे. सुप्रिया चुकून विहिरीत पडली की हा घतपाताचा प्रकार आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Intro:शहरातील ख्रिस्त कॉलनी परिसरात आशादीप गतिमंद शाळेजवळ रविवारी सकाळी राहायला आल्यावर दुपारी साडेतीन वाजत बेपत्ता झालेल्या सुप्रिया श्याम काबरा या सात वर्षाच्या मतिमंद चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी दुपारी ती राहायला आलेल्या घराच्या आवारातील विहिरीत आढळला.

Body:चांदूरबाजार येथील मूळ रहिवासी असणाऱ्या प्रीती काबरा आपल्या दोन गतिमंद मुलींसह रविवारी ख्रिस्त कॉलनी परिसरात क्षीरसागर यांच्या घरात भाड्याने राहायला आल्या होत्या. रविवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून चिमुकली सुप्रिया दिसेनाशी झाल्याने प्रीती काबरा आणि त्यांच्या आई-वडिलांनी सुप्रियचा परिसरात शोध घेतला. व्यवस्थित चालता येत नाही, बोलताही येत नासलेली सुप्रियाचा शोध ख्रिस्त कॉलनी परिसरातील युवकांनीही रविवारी रात्रभर घेतला. याबाबत गडगेनगर पोलिसात तक्रारही देण्यात आली होती. पोलिसांनी प्रीती काबरा यांच्या चांदूरबाजार आणि धामणगाव रेल्वे येथील सर्व नातेवाइकांची चौकशीही सुरू केली होती.
दरम्यान आज दुपारी अंगणातील विहिरीतून दुर्गंध यायला लागल्याने घरमलकांनी विहिरीत डोकावले असता सुप्रियचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने विहिरीततुन बाहेर काढलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला. सुप्रिया आपोआप विहिरीत पडली की हा घतपाताचा प्रकार आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.