ETV Bharat / state

केंद्र सरकारविरोधात बच्चू कडूंचे 'थाळी बजाओ' आंदोलन

खतांच्या किंमतीत वाढ व तूर आयातीच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अमरावतीच्या राजकमल चौकात 'थाळी बजाओ' आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला.

thali bajao agitation by bacchu kadu in amravati
अमरावती : केंद्र सरकारविरोधात बच्चू कडूंचे 'थाळी बजाओ' आंदोलन
author img

By

Published : May 20, 2021, 7:58 PM IST

अमरावती - केंद्र सरकारने वाढवलेल्या खतांच्या किंमतीत वाढ व तूर आयातीच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह अमरावतीच्या राजकमल चौकात 'थाळी बजाओ' आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध केला. तसेच केंद्र सरकारचे तूर आयातीचे धोरण चुकीचे असल्याची टीकाही त्यांनी केली.

प्रतिक्रिया

हे शेतकऱ्यांच्या पिकांचे भाव पाडण्याचे षडयंत्र -

केंद्र सरकारचे धोरण हे नेहमी शेतकरीविरोधी राहिलेले आहे. यावर्षी जवळपास ३८ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आधीच ८ ते ९ लाख टन आपली तूर शिलक असताना पुन्हा केंद्र सरकार ९ लाख टन तूर आयात करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूग, तूर, उळीड, हरबरा आदी पिकांचे भाव पाडण्याचे षडयंत्र केंद्र सरकारतर्फे सुरू असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

आंदोलनानंतर केंद्र सरकारला सद्बुद्धी सुचली -

केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढवल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. पण शेतकऱ्यांनी उठलेल्या आवाजानंतर केंद्र सरकारला सद्बुद्धी सुचली. सरकारने खतांचे भाव कमी करण्याचे सांगितले. मात्र, नेमके खतांचे भाव किती कमी करणार, याबाबत अनिश्चितता असल्याचेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा - माझ्या पतीला शोधा - बेपत्ता राध्येशाम ठाकूर यांच्या पत्नीची प्रशासनाला विनंती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.