ETV Bharat / state

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांचे घरापुढील अंगणात आंदोलन

author img

By

Published : May 30, 2020, 3:31 PM IST

शासनाने 25 जूननंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयासोबत काही मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य शिक्षक संघाच्या वतीने आज अमरावतीत घराच्या अंगणात आंदोलन करण्यात आले. 

agitation
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांचे घराच्या अंगणात आंदोलन

अमरावती - कोरोनाचे संकट वाढत असतानाही शासनाने 25 जूननंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयासोबत काही मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य शिक्षक संघाच्या वतीने आज अमरावतीत घराच्या अंगणात आंदोलन करण्यात आले.

सोशल डिस्टंसिंग ठेवत करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान शासनाने अनुदानात पात्र ठरलेल्या शाळा, तुकड्या व कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित सुरू करावे. अघोषित शाळा घोषित कराव्या. यासोबतच कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याखेरीज शाळा सुरू करण्यात येऊ नये. शाळा सुरू करताना पहिल्या टप्प्यात वर्ग दहावी आणि बारावीचे वर्ग विषयावर विभागून सुरू करावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाशिवाय लागू करावी. टीईटी नसलेल्या शिक्षकांना कामावरून कमी करू नये. तसेच कोरोनामुळे अनेक कामगारांचे स्थलांतर झाले असल्यामुळे अनेक शाळेतील विद्यार्थी अचानक कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी संच मान्यता स्थगित करावी, शिक्षकांना अतिरिक्त करू नये, अशा आमच्या मागण्या असल्याचे राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप कडू 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप कडू यांच्या घराच्या अंगणात आयोजित या आंदोलनात नंदकिशोर नवरे, श्रीकांत लाजुरकर, अनिल भारसाकळे, श्रीकांत कडू, आर.एस. चरपे, नितीन सावळे आदी शिक्षक सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.