ETV Bharat / state

ZP Teacher Viral Video: गुरुजींचे टेबलवर झोपून राजेशाही थाटात मोबाईलवर बोलणे; व्हिडिओ व्हायरल - जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा एक अजब व्हिडीओ

अमरावती जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा एक अजब व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हा शिक्षक शाळेच्या खिडकीजवळ असलेल्या टेबलवर झोपून मोबाईलवर बोलण्यात गुंग आहे. एका दक्ष गावकऱ्याने हा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोगर्डा येथील शाळेत ही घटना घडली आहे.

ZP Teacher Viral Video
शिक्षक
author img

By

Published : Jul 28, 2023, 10:28 PM IST

अमरावती जिल्ह्यातील शिक्षकाचा व्हायरल व्हिडीओ

अमरावती : जिल्हा परिषद शाळांची अवस्था सध्या विद्यार्थ्यांविना अत्यंत बिकट झाली आहे. विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेकडे न वळण्याच्या अनेक कारणापैकी गुरुजींचे वर्तनही तेवढेच कारणीभूत आहे. असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोगर्डा येथील शाळेत घडला आहे. येथे एक शिक्षक चक्क टेबलवर झोपून मोबाईल फोन कॉलमध्ये व्यग्र असल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

असा आहे संपूर्ण प्रकार : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोगर्डा या छोट्याशा गावात जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ४ पर्यंतची शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या १० असून ही सर्व मुले काबाडकष्ट करून पोट भरणाऱ्या आणि तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवण्याची आर्थिक परिस्थिती नसणाऱ्यांचीच आहेत. शाळेत दोन शिक्षक असून त्यातील एक शिक्षिका रजेवर असताना दुसरे शिक्षक विलास पुसाम हे गुरुवारी वर्गखोलीतील एका टेबलवर चक्क झोपून मोबाईल कॉलवर व्यग्र असल्याचा व्हिडीओ एका गावकऱ्याने काढला.

'ओ साहेब' म्हणून आवाज दिला, पण : या व्हिडीओत संबंधित शिक्षक शाळेच्या खिडकीजवळ असलेल्या एका टेबलवर झोपून, पाय लांब करून राजेशाही थाटात मोबाईलवर बोलत होते. हे सर्व करत असताना खिडकीच्या बाहेरून कोणीतरी आपला व्हिडिओ शूटिंग करत असल्याचेही या शिक्षकाला भान नव्हते. हा व्हिडिओ काढणारी व्यक्ती गुरुजीला 'ओ साहेब' म्हणून आवाज देते; परंतु गुरुजी फोनवर बोलण्यात एवढे गुंतलेले दिसतात की, शेवटी व्हिडिओ काढणारी व्यक्ती जवळ जाऊन आवाज देते. हा व्हिडिओ संबधित व्यक्तीने गावातील सोशल मीडियावर व्हायरल केला आणि पाहता-पाहता तो गटविकास अधिकारी ते गटशिक्षणाधिकाऱ्या पर्यंत पोहचला. परंतु त्या शिक्षकाच्या या गैरवर्तनाचा प्रकार शिक्षण विभागातून तंबी देऊन गुंडाळण्यात आला. एकंदरीत शिक्षण विभाग या शिक्षकाच्या वागण्यावर पडदा टाकण्याचे काम करीत आहे, असे गावकरी म्हणत आहेत.

कारवाई होणार का - या संदर्भात गटविकास अधिकारी विनोद खेडकर यांच्याशी संपर्क केला असता गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई आदेशित केल्याचे सांगितले. तर प्रभारी गटशिक्षणाधिकारी चिखलदरा येथे असल्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. यापूर्वीही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा समोर आला आहे. मात्र, आपल्या अशा वागण्यामुळेच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांकडे पाठ फिरविली आहे, ही बाब या शिक्षकांच्या लक्षात येत नाही, अशीच चर्चा गावात होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.