ETV Bharat / state

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भर उन्हाळ्यात पंखे बंद; रुग्णांचा जीव मेटाकुटीला

महिलांच्या प्रसूतीसाठी सर्वात स्वस्त रुग्णालय म्हणून लोकांचा या रुग्णालयाकडे कल असतो. परंतू या रुग्णालयात अनेक सुविधा मिळत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

author img

By

Published : Mar 31, 2021, 7:07 PM IST

Updated : Mar 31, 2021, 7:53 PM IST

जिल्हा स्त्री रुग्णालय
जिल्हा स्त्री रुग्णालय

अमरावती - एकीकडे उन्हामुळे जीवाची लाही लाही होत आहे. त्यामुळे लोक त्रस्त होत आहे. मात्र दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठया जिल्हा स्त्री सामन्य रुग्णालयात सुविधेच्या अभावामुळे लहान बालकांना कमालीचा त्रास सहन कारावा लागत आहे. भर उन्हाळ्यात पंखे बंद असल्याने रुग्णांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भर उन्हाळ्यात पंखे बंद
अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठे जिल्हा स्री रुग्णालयाची म्हणून डफरीण रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात हजारो महिला व बालकांवर उपचार केले जातात. महिलांच्या प्रसूतीसाठी सर्वात स्वस्त रुग्णालय म्हणून लोकांचा या रुग्णालयाकडे कल असतो. परंतू या रुग्णालयात अनेक सुविधा मिळत नसल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.इलेक्ट्रीक वायरिंग उघडेभंडारा येथील सरकारी रुग्णालयात आग लागल्याने १० बालक दगावले होते. अमरावती जिल्ह्यातील पंजाबराव देशमुख रुग्णालयात देखील काही वर्षांपूर्वी आयसीयूमध्ये गुदमरून 4 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटना डोळ्यासमोर असतांना देखील या रुग्णालयात एका ठिकाणी वायरिंग उघडीच ठेवण्यात आली होती. रुग्णालयाच्या या हलगर्जी कारभार रुग्णांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. स्वछता अनेक ठिकाणी नाहीकोरोनाचा सध्या काळ सुरू आहे.त्यात रुग्णालय स्वच्छ असणे गरजेचे आहे.असे असताना सुद्धा या रुग्णालयात अनेक ठिकाणी कचरा दिसून आला त्यामुळे या बाबी कडे लक्ष देणे हे गरजेचे आहे. लहान बालकाना देणाऱ्या आरोग्य सुविधा पुरेपूर दिल्या जाते का. उपचारासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे का याची माहिती घेण्यासाठी ईटीव्ही भारतने वारंवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ शामसुंदर निकम यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.

Last Updated : Mar 31, 2021, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.