अमरावती- राज्याच्या सत्ता स्थापनेत सर्वोच्च न्यायालयाला पडण्याचा अधिकार नाही आणि त्यांनी यामध्ये पडूच नये. न्यायालयाने सत्ता स्थापनेत दखल घेणे म्हणजे बेकायदेशीर झाले त्याला पाठिंबा देणे, असा अर्थ होत असल्याचे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज केले.
जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. बाळासाहेब आंबेडकर यांनी जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे आज दुपारी कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यादरम्यान पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निषेध केला. बाळासाहेब म्हणाले की, राज्यपालांनी ज्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली अशांची असेंम्बली बोलावून फ्लोअर टेस्ट करावी. त्यांच्याजवळ किती बहुमत आहे ते तपासावे, असे सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना सांगायला हवे होते. सर्वोच्च न्यायालय जर संविधानिक बाबी मानायला तयार नसेल. तर मी असे माणतो की न्यायालय संविधान मानायला तैयार नाही. तर आपण त्याठिकाणी शहाणपणा घालू शकतो असे सुचवनेसुद्धा चुकीचे असल्याचे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले.