ETV Bharat / state

शाब्बास रे पठ्ठ्या! जीना इसी का नाम है... शाळा बंद असल्याने स्कुल व्हॅनमध्ये सुरू केली रसवंती

मागील एक वर्षापासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे, शाळेत लहान मुलांची ने-आण करणाऱ्या स्कुल बससुद्धा बंद असल्याने स्कुल बस चालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. असे असताना अमरावतीमध्ये एका स्कुल बस चालकाने अनोखी शक्कल लढवत स्कुल व्हॅनमध्येच उसाच्या रसाची रसवंती सुरू केली आहे.

Nikhis Misal School Van Raswanti Amravati
निखिस मिसळ स्कुल व्हॅन रसवंती अमरावती
author img

By

Published : Apr 7, 2021, 3:42 PM IST

Updated : Apr 7, 2021, 5:01 PM IST

अमरावती - कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मागील एक वर्षापासून सर्वच क्षेत्राला जबर फटका बसला आहे. मागील एक वर्षापासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे, शाळेत लहान मुलांची ने-आण करणाऱ्या स्कुल बससुद्धा बंद असल्याने स्कुल बस चालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. असे असताना अमरावतीमध्ये एका स्कुल बस चालकाने अनोखी शक्कल लढवत स्कुल व्हॅनमध्येच उसाच्या रसाची रसवंती सुरू केली आहे. निखिल मिसळ, असे या स्कुल व्हॅन चालकाचे नाव आहे.

शाळा बंद असल्याने स्कुल व्हॅन चालकाने व्हॅनमध्ये सुरू केली रसवंती

हेही वाचा - 'ब्रेक द चेन'ला शिथिलता देण्याची यशोमती ठाकूर यांची मागणी

रसवंती सुरू करायला लागला ३० हजारांचा खर्च

स्कुल व्हॅनमध्ये रसवंती सुरू करणारे निखिल मिसळ सांगतात, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. कुटुंब चालवायला कुठलेच साधन नव्हते. अशा परिस्थितीत आपल्याच स्कुल व्हॅनमध्ये रसवंती सुरू करण्याचा विचार मनात आला. त्यासाठी तीस हजारांची जुळवाजुळव करून ही रसवंती सुरू केली.

दररोज 400 ते 500 रुपये कमाई

निखिल मिसळ यांनी सुरू केलेल्या रसवंतीमधून त्यांना दररोज 400 ते 500 रुपये कमाई होते. सध्या उन्हाळा असल्याने ग्राहक रसवंतीला पसंती देत असल्याचे पाहायला मिळाले.

फायनान्स कंपनीच्या थकल्या आहेत किस्त

निखिल मिसाळ यांनी स्कुल व्हॅन फायनान्स कंपनीकडून घेतली होती. परंतु, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने त्यांच्या फायनान्सच्या अनेक किस्ता थकलेल्या आहेत. त्यामुळे, बँकेतर्फे वारंवार फोन येत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - रेड्डी आणि शिवकुमारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; बेलदार भटका समाज संघटनेची मागणी

Last Updated : Apr 7, 2021, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.