ETV Bharat / state

दप्तरातील वस्तूबद्दल विचारणा करत शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण - amravati crime news

दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थिनीला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या शिक्षकाविरुध्द पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

student-beaten-up-by-teacher-case-filed-against-teacher
दप्तरातील वस्तूबद्दल विचारणा करत शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण
author img

By

Published : Jan 10, 2020, 2:13 AM IST

Updated : Jan 10, 2020, 6:43 AM IST

अमरावती - दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थिनीला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या शिक्षकाविरुध्द पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शाळेतील शिक्षक नरेंद्र गोंडाणे यांनी वर्गातील विद्यार्थिनींना काही प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांनी मुलींचे दप्तर तपासले. दरम्यान, पीडित मुलीच्या दप्तरात काही आक्षेपार्ह वस्तू आढळल्याने त्याबद्दल विचारणा केली. तिच्याकडून समाधानकार उत्तर न मिळाल्याने शिक्षकाचा पारा चढला. मधल्या सुट्टीत वर्गात कोणीही नसताना पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणींना त्याने बेदम मारहाण केली. अक्षरशः रुळ आणि पाईपने त्याने मुलींच्या पाठीवर आणि पायावर मारले. या मारहाणीचे व्रणही पीडित मुलीच्या अंगावर उमटले. या मारहाणीमुळे तिला चालताही येत नव्हते. तिच्या मैत्रिणीने कसेबसे तिला घरी पोहोचविले.

यावेळी पीडितीचे पालक कामावर गेले असल्याने ते घरी नव्हते. त्यामुळे तिला रुग्णालयात जाता आले नाही. पालक घरी परतल्यानंतर तिने घडलेली घटना पालकांना सांगितली. झालेल्या प्रकारामुळे ती घाबरून गेली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तिच्या पालकांनी तातडीने पोलिस ठाणे गाठून सदर शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली.

हेही वाचा - 'साहित्य संमेलनाला जाऊ नका' संमेलनाचे उद्घाटक ना. धों. महानोर यांना धमकी

Intro:अमरावती:शिक्षकाची विद्यार्थीनीला बेदम मारहाण ,पोलिसात तक्रार दाखल .

अमरावतीच्या दर्यापूर मधील घटना.
-----------------------------------------------------
अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयच्या वर्ग अकरावीच्या शिकणाऱ्या विद्यार्थिनीला दुपारच्या सुट्टीत शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज घडली.ज्या विद्यार्थीनीला शिक्षकाने बेदम मारहाण केली त्या विरोधात विद्यार्थिनीने पालकां समवेत पोलिसात तक्रार दिली आहे.

दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील अकराव्या वर्गातील विद्यार्थिनी वर्गात बसलेल्या असताना शाळेतील शिक्षक नरेंद्र गोंडाणे यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्यानंतर मुलींची दप्तर तपासले. त्यावेळी शिक्षक गोंडाणे यांनी शाळेमध्ये अश्या वस्तु का आणल्या अशी विचारणा केली विद्यार्थीनीना केली परंतु विद्यार्थी नी कडून समर्पक उत्तर न मिळाल्याने शिक्षकाचा पारा चढला. मधल्या सुट्टीत वर्गात कोणीही नसताना पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणींना शिक्षकाने मारहाण केली. शिक्षा करताना वर्गशिक्षकाचा पारा एवढा चढला होता की, मुलींना अक्षरशः रुळ आणि पाईपच्या साह्याने पाठीवर व पायावर मारहाण केली. केलेल्या शिक्षेचे व्रण पीडित मुलीच्या अंगावर उमटले. या मारहाणीने पीडित मुलगी घाबरून गेली. मारहाणीमुळे पीडित मुलीला चालता सुद्धा येत नव्हते. शाळेतील वर्ग मैत्रिणीने कसेबसे तीला घरी पोहोचविले. यावेळी पीडितीचे पालक कामावर गेले असल्याने घरी कोणीही नव्हते. तिला रुग्णालयात जाता आले नाही. पीडितेचे पालक घरी परतल्यानंतर तिने झालेली घटना पालकांना सांगितली. ते लगेच पोलिस ठाण्यात पोहचले. सदर शिक्षका विरोधात तक्रार दाखल केली...Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Jan 10, 2020, 6:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.