ETV Bharat / state

Municipal Commissioner Ink Thrown Case : राजापेठ उड्डाणपूल परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, आमदार राणा यांना अटक करण्यासाठी पोलिसांची तयारी - अमरावती महापालिका आयुक्त शाई फेक प्रकरण

अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणात ( Municipal Commissioner Ink Thrown Case ) आरोपी असणारे बडनेराचे आमदार रवी राणा यांना ( Police to arrest MLA Rana ) अटक करण्यासाठीही पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी राजापेठ उड्डाणपुलावर ( Shivaji Maharaj statue on Rajapeth flyover ) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, अशी भूमिका खासदार नवनीत राणा यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे राजापेठ उड्डाणपूल परिसरात मंगळवारी रात्रीपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

राजापेठ उड्डाणपूल परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, आमदार राणा यांना अटक करण्यासाठी पोलिसांची तयारी

author img

By

Published : Feb 16, 2022, 7:34 AM IST

Updated : Feb 16, 2022, 2:43 PM IST

अमरावती - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी राजापेठ उड्डाणपुलावर ( Shivaji Maharaj statue on Rajapeth flyover ) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, अशी भूमिका खासदार नवनीत राणा यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे राजापेठ उड्डाणपूल परिसरात मंगळवारी रात्रीपासूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावरील शाईफेक प्रकरणात ( Municipal Commissioner Ink Thrown Case ) आरोपी असणारे बडनेराचे आमदार रवी राणा यांना ( Police to arrest Yuva Swabhiman Party MLA Ravi Rana) अटक करण्यासाठीही पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

राजापेठ उड्डाणपूल परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
उड्डाणपुलाच्या तिने बाजूला पोलीस चौकी -

राजापेठ उड्डाणपुलावर आमदार रवी राणा यांनी 12 जानेवारीच्या मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठलीही परवानगी न घेता बसवला होता. महापालिका प्रशासनाने हा पुतळा हटविल्यानंतर आमदार रवि राणा यांची युवा स्वाभिमान संघटना आणि महापालिका प्रशासनाविरोधात वाद उफाळून आला होता. या वादातून आमदार राणा यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना 9 फेब्रुवारी रोजी राजापेठ भुयारी मार्गावर पाणी साचत असल्याबाबत तक्रार करून पाहणी करण्यासाठी बोलावले होते. महापालिका आयुक्त राजापेठ भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी आले असता युवा स्वाभिमान संघटनेच्या तीन महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी आठ ते दहा राणा समर्थक घटनास्थळी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून आमदार रवी राणा यांच्यासह इतर आरोपी अद्यापही पोलिसांना सापडले नाही. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या तीन दिवसांवर आले असताना राजापेठ उड्डाणपुलावर कुठलाही वाद होऊ नये, याची खबरदारी म्हणून पोलिसांनी राजापेठ परिसरात एकूण 9 ठिकाणी पोलीस चौकी लावली आहे. राजापेठ उड्डाणपुलावर जाणाऱ्या तिन्ही मार्गांवर राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

पोलिसांनी केला रूट मार्च -

राजापेठ उड्डाणपूल परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यापूर्वी शहर पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाने राजापेठ, शंकर नगर, फरशी स्टॉप परिसर, दस्तुर नगर , गोंड बाबा मंदिर परिसर या भागातून मंगळवारी रूट मार्च काढला.

आमदार रवी राणा मंगळवारी शुक्रवारी येणार अमरावती

आमदार रवी राणा हे सध्या दिल्लीत असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिका आयुक्तांवर शाई फेक केल्याच्या प्रकरणात माझा काहीएक संबंध नसल्याचे त्यांनी सोमवारी जाहीर केले होते. असे असले तरी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करेल, असे आमदार राणा यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाला मला पकडण्याची घाई झाली असेल तर त्यांनी पोलिसांना दिंडीत पाठवावे, असेही आमदार रवी राणा यांनी म्हटले होते. आता आमदार रवी राणा हे शुक्रवारी अमरावतीत येणार असल्याची माहिती असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला नसल्याची माहिती त्यांचे वकील दीप मिश्रा यांनी दिली आहे.

हेही वाचा - The Great Freedom Fighter Tatya Tope : जाणून घ्या! नाना साहेबांचे उजवे हात असलेले स्वातंत्र्य सैनिक तात्या टोपे यांची वीरगाथा

Last Updated : Feb 16, 2022, 2:43 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.