ETV Bharat / state

शेण खाऊन 'तो'करतो मातीचं सोनं

शेण खाऊन जगणारा शेणकिडा याला शेतकऱ्यांचा मित्रही म्हटले जाते. हा किडा पाळीव प्राणी, वन्यप्राण्यांचे शेण खाऊन जगतो. तसेच वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी होण्यास या किड्यांची अप्रत्यक्ष मदतच होते. जमीन सुपीक करण्याचे कामही हा किडा करत असतो.

शेतकऱ्यांचा मित्र 'शेणकिडा'
author img

By

Published : Nov 25, 2019, 3:41 PM IST

Updated : Nov 25, 2019, 7:14 PM IST

अमरावती - गाय, म्हैस या पाळीव प्राण्यांसह नीलगाय, रानगवा अशा वन्यप्राण्यांचे शेण खाऊन जगणारा शेणकिडा(dung beetle) हा स्वछ वातावरण निर्मितीस मदत करतो. तसेच जमीन सुपीक बनवण्यास देखील अतिशय उपयुक्त अशी भूमिका वठवतो. खर तर, एका अर्थाने मातीचे सोने बनवणारा 'हा' किडा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून महत्वाचा ठरतो.

तपकिरी रंगातील शेणकिडा
तपकिरी रंगातील शेणकिडा

शेणकिड्याला कीटक वर्गात समाविष्ट करण्यात आले असून, देशात याच्या ३ प्रजाती आढळतात. हा काळ्या किंवा तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या शरीराचे डोके, छाती आणि पोट असे ३ भाग असतात. त्याचे डोके रुंद आणि चपटे असून या डोक्याच्या साहाय्याने हे किडे ताज्या शेणाचा छोटासा भाग वेगळा करतात. त्यानंतर, शेणाच्या तुकड्यास जबडा आणि पायाच्या साहाय्याने गोल आकार देतात. शेणाचा हा गोळा ते मागच्या पायाने पुढे ढकलत पुढे सरकतात. अशा प्रकारे तो शेणाचा गोळा अर्धा किलोमीटर पर्यंत ढकलत नेऊ शकतात.

शेतकऱ्यांचा मित्र 'शेणकिडा'

शेणकिड्यांमध्ये स्वतःच्या आकारापेक्षा तिप्पट मोठ्या तसेच तब्बल १०४५ पटीहून अधिक वजनाचा शेणाचा गोळा वाहून नेण्याची क्षमता असते. यातील नर किडा हा बीळ तयार करतो. दरम्यान, मादी ही शेणाच्या गोळ्यांचे सरंक्षण करते. बीळ तयार होताच मादी शेणाचा गोळा बिळाकडे ढकलते आणि हे गोळे बिळात साठवले जातात. नंतर या गोळ्यांवरच मादी अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या या शेणाच्या गोळ्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. यानंतर अळ्या आपल्या भोवताली कोष तयार करतात. कोषावस्थेतून बाहेर पडण्यास त्यांना १ वर्षाचा कालावधी लागतो. पाऊस पडून जमीन मऊ होईपर्यंत हे किडे बाहेर पडत नाहीत.

हेही वाचा - सत्ता स्थापनेत सर्वोच्च न्यायालयाला पडण्याचा अधिकार नाही- बाळासाहेब आंबेडकर

हे किडे काही टन शेण गोळ्यांच्या स्वरूपात बिळात साठवतात आणि अन्न म्हणून वापरतात. तसेच वातावरण स्वच्छ व आरोग्यदायी होण्यास या किड्यांची अप्रत्यक्ष मदतच होते. जमीन सुपीक करण्याचे कामही हा किडा करतो. मात्र, दुर्दैवाने शेतकऱ्यांचा खरा मित्र असणाऱ्या शेण किड्यांचे अस्तित्व रासायनिक खतांमुळे आज कमी होत आहे.

हेही वाचा - पोहरा-मालखेड जंगल प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मिळाली 'दिशा'

Intro:गाय, म्हैस या पाळीव प्राण्यांसह तसेच नीलगाय, रानगवा आशा वन्यप्राण्यांचे शेण खाऊन जगणारा शेणकिडा(dung beetle) हा स्वछ वातावरण निर्मितीस मदत करून जमीन सुपीक बनविण्यास मदत अतिशय उपयुक्त भूमिका निसर्गात वठवितो. खार तर एका अर्थाने मातीचे सोने बनविणारा हा किडा शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही महत्वाचा ठरतो.

Body:शेणकिडा हा कीटक वर्गात मोडतो. भारतात याच्या तीन प्रजाती आढळतात. हा काळ्या किंवा तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या शरीराचे डोके, छाती आणि पोट असे तीन भाग पडतात. त्याचे डोके रुंद आणि चपटे असते. चपट्या डोक्याच्या साह्याने हे किडे ताज्या शेणाचा छोटासा भाग वेगळा करतात. शेणाच्या तुकड्यास जबडा आणि पायाच्या साहाय्याने गोल आकार देतात. शेणाचा हा गोळा ते मागच्या पायाने पुढे ढकलतात आणि पुढचे पाय जमिनीवर टेकवतात. कीडा उलटा होऊन पुढे सरकतो. आशा प्रकारे तो शेणाचा गोळा अर्धा किलोमीटर पर्यंत ढकलत नेऊ शकतो.
स्वतःच्या आकारापेक्षा तिप्पट मोठा आणि वजनाने तब्बल 1045 पटीहून अधिक वजनाचा हा शेणाचा गोळा नेण्याची क्षमता या किड्यांची आहे. नर किडा हा बीळ तयार करतो. त्यावेळी मादी ही शेंणाच्या गोळ्यांचे सरंक्षण करते. बीळ तयार होतात मादी शेणाचा गोळा बिळाकडे ढकलते. शेणाचे गोळे बिळात साठविले जातात. या गोळ्यांवर मादी अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या साठविलेल्या शेणाच्या गोळ्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. त्यांना या अळ्या आपल्या भोवताली कोष तयार करतात. कोषावस्थेतून बाहेर पडण्यास त्यांना एक वर्षाचा कालावधी लागतो. टणक जमीन पाऊस पडल्यावर भिजून मऊ होईपर्यंत हे किडे बाहेर पडत नाहीत.
हे किडे काही टन शेण गोळ्यांच्या स्वरूपात बिळात साठवितात आणि अन्न म्हणून वापरत. वातावरण स्वछ व आरोग्यदायी होण्यास या किड्यांची अप्रत्यक्ष मदतच होते. जमीन सुपीक करण्याचे कामही हा कीड करतो. शेतकऱ्यांचा खरा मित्र असणाऱ्या शेण किड्याचे अस्तित्व रासायनिक खतांमुळे कमी होत आहे हे दुर्दैव.

Conclusion:
Last Updated : Nov 25, 2019, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.