अमरावती - राज्यमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वतः यासंबंधीची माहिती ट्विट करून करून दिली आहे. मंत्री कडू यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तत्काळ कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बच्चू कडू यांची प्रकृती बरी असून ते सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. मंत्री कडू यांना कोरोना होण्याची ही दुसरी वेळ आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतच बच्चू कडू हे संक्रमित झाले होते.
अमरावतीत रविवारी जनता कर्फ्यू
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल दिवसभरात कोरोनाचे तब्बल 597 रुग्ण सापडले तर, चार कोरोना बधितांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.