ETV Bharat / state

गोल दगडांचे कुतूहल...मेळघाटात होत आहे 'गोल्यादेवाची' पूजा

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नरनाळा अभयारण्य परिसरात घनदाट जंगलात दऱ्या-खोऱ्यातून वाहत असणाऱ्या एका नाल्यात गोलाकार दगड सापडतात. विशेष म्हणजे संपूर्ण मेळघाटात केवळ याच नाल्यात अगदी फुटबॉल प्रमाणे गोल असणारे हे दगड म्हणजे एक आश्चर्यच आहे.

spherical boulders
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नरनाळा अभयारण्य परिसरात घनदाट जंगलात दऱ्या-खोऱ्यातून वाहत असणाऱ्या एका नाल्यात गोलाकार दगड सापडतात.
author img

By

Published : Oct 7, 2020, 9:36 AM IST

Updated : Oct 7, 2020, 9:43 AM IST

अमरावती - दक्षिण अमेरिकेतील कोस्टारीकाच्या जंगलात 1930 साली आढळलेले गोल दगड आणि युरोपात हर्जेगोवेनियाच्या जंगलात 2004 सालात सापडलेल्या गोलाकार दगडांबाबत जगभरात कुतूहल होते. यावेळी मेळघाटातही अशाच प्रकारचे गोल दगड एका विशिष्ट भागात पाण्याच्या प्रवाहात आढळले आहेत. आदिवासी लोक परंपरेनुसार या दगडांना गोल्यादेव असे संबोधून त्यांची अनेक वर्षांपासून पूजा करत आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नरनाळा अभयारण्य परिसरात घनदाट जंगलात दऱ्या-खोऱ्यातून वाहत असणाऱ्या एका नाल्यात गोलाकार दगड सापडतात.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नरनाळा अभयारण्य परिसरात घनदाट जंगलात दऱ्या-खोऱ्यातून वाहत असणाऱ्या एका नाल्यात गोलाकार दगड सापडतात. विशेष म्हणजे संपूर्ण मेळघाटात केवळ याच नाल्यात अगदी फुटबॉल प्रमाणे गोल असणारे हे दगड म्हणजे एक आश्चर्यच आहे.
spherical boulders
गोल दगडांचे कुतूहल...मेळघाटात होत आहे 'गोल्यादेवाची' पूजा

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरापासून 17 किलोमीटर अंतरावर पोपटखेडा येथून नरनाळा किल्ल्याकडे जाताना मलकापूर गोंड हे छोटेसं गाव लागतं. या गावात गोल्यादेवची पूजा केली जाते. या गावात एकूण चार गोल्यादेव आहेत. गावापासून 4 किमी अंतरावर जंगलात खोल दरीत वाहणारा नाला आहे. गोल्यादेवचा नाला अशी ओळख असणाऱ्या या नल्याकडे पाऊलवाटेने जाताना जंगलात एका डोंगरावर गोल्यादेवाचे मंदिर आहे. उघड्यावर असणाऱ्या या मंदिरात गोल्यादेव आणि हनुमानाच्या मूर्तीसोबतच मूर्तीस्वरुपात नंदी आहे. या मंदिरालगत असणारी टेकडी पार केल्यावर खोल दरीत नाला वाहतो. यात शेकडो गोल्यादेव अर्थात गोल दगड आढळतात. या दगडांचा घेर 150 से.मी. असल्याचे लक्षात येते.

हत्तीच्या मदतीने काढण्यात आले 80 दगड

1990 साली दिवंगत विजय भोसले हे अकोट वनपरिक्षेत्र अधिकारी असताना त्यांनी मलकापूर गोंड गावातील गोल्यादेवची उत्सुकतेने चौकशी केली. त्यावेळी गोल्यादेव नाल्यात गोलाकार दगडांचा खजिना त्यांना आढळून आला. त्यावेळी वन विभागाकडे असणाऱ्या जयश्री या हत्तीण आणि तिचा माहूत कालू चिमटे यांच्या मदतीने तीनशे किलो वजनाचा एक असे 80 दगड सलग दोन महिने प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले. यापैकी 4 दगड मलकापूर गोंड गावात तर अकोट वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात 23, परतवाडा येथील राष्ट्रीय गुगामाल उद्यान विभागाच्या कार्यल्यासमोर काही दगड ठेवण्यात आले आहेत. पाच दगड हे अमरावती शहरात विजय भोसले यांच्या शाकुंतल कॉलनी स्थित घराच्या अंगणात ठेवले. या पाच पैकी 2 दगड हे कॉलनीतील श्री राम मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर ठेवले आहेत. काही वन अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनीही हे दगड शोभेची वस्तू म्हणून त्यांच्या घरी नेली आहेत.

यांत्रिकी आणि रासायनिकी विदारणामुळे दगडांना गोल आकार

भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर या दगडांमध्ये खूप सारे खनिज द्रव्य आहेत.सोबतच ज्या ठिकाणी पाण्याचे प्रमाण अधिक आहे आणि जिथे नदी उंचावरून खाली वाहते तिथे हे दगड आढळतात. उंचावरून खाली वाहणाऱ्या नदीच्या वेगासोबत दगडांची मोठ्या प्रमाणात झीज होते. म्हणजे याठिकाणी यांत्रिकी विदारण मोठया प्रमाणात होते, आणि सोबत रासायनिक विदारणही होते. या दोन्ही विदरणांमुळे दगडांचा आकार गोल झाला असावा, असा अंदाज शिवाजी विज्ञान आणि कला व वाणिज्य महाविद्यालयात भूगोल विषयाच्या प्रधायपक डॉ. शुभांगी देशमुख यांनी ' ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केला.

Last Updated : Oct 7, 2020, 9:43 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.