अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन आहे. उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वऱ्हाड संस्थेच्या वतीने दरोरोज शेकडो लोकांना जेवण दिले जात आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा येथील विद्यार्थीही अमरावतील अडकले आहेत. त्याच्यासाठी देखील साऊथ इंडियन जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा- पन्नाशीवरील कर्मचाऱ्यांना 'फील्ड ड्युटी' नाही, पुणे पोलिसांचा निर्णय
लॉकडाऊनमुळे अमरावतीत बाहेरील नागरिक अडकून आहेत. त्यांना जेवणाची अडचणी होऊ नये यासाठी वऱ्हाड संस्थेचे पुढाकार घेऊन अमरावती शहरातील महादेव खोरी परिसरातील दरोरोज एक हजार पेक्षा जास्त लोकांना सकाळ संध्याकाळ जेवण दिले जाते. तसेच कारागृहातील 300 बंदिस्त लोकांच्या घरी या संस्थेने प्रत्येकी 2 हजारांची मदत केली आहे.
अमरावती शहरात शिक्षण घेण्यासाठी असलेले आंध्रप्रदेश आणि तेलंगणातील जवळपास 250 विद्यार्थ्यांना महाराष्ट्रीयन जेवन दिले जात होते. परंतु, त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रीयन जेवणाची सवय नसल्याने त्यांना पोटाचा त्रास होत असल्याचे त्या विद्यार्थ्यांच म्हणणे होते. दरम्यान, हा त्रास टाळण्यासाठी आता वऱ्हाड संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांना साऊथ इंडियन पदार्थांचे जेवण दिले जात आहे.