अमरावती - साप हा शब्दही कानावर पडला तर आपल्याला भिती वाटते. असंच बडनेरा शहरात गुरुवारी सायंकाळी मधबन कॉलनीमध्ये साप निघाला. लोकांनी सर्पमित्र सचिन नेवारे यांना कळवले. त्यांनी घटनास्थळी येऊन सापाला बंदिस्त केले. मात्र हा साप नाग या जातीचा विषारी साप होता. सापाने कापड गिळल्याने ते बाहेर काढताना सर्पमित्राला कष्ट घ्यावे लागले.
हेही वाचा -ऐकावं ते नवलंच! कोब्रा जातीच्या सापानं खाल्ला कांदा
सर्पमित्र अजय यादव यांनी सापाच्या तोंडातून कापड बाहेर काढल्यानंतर ते म्हणाले, शिकार करताना बहुतेक सापाने तो कपडाही गिळला असेल अशी शक्यता आहे.
हेही वाचा - लोणावळ्यात आढळला १२ फूट लांब अजगर; पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयात केली रवानगी