'देशाला स्वराज्याची परिभाषा देणाऱ्या महाराष्ट्रात कलम 370 बद्दल नाही बोलायचं तर कुठे बोलणार' - भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख प्रचारासभा
ज्या महाराष्ट्राने देशाला स्वराज्याची परिभाषा शिकवली त्या महाराष्ट्रात कलम 370 बद्दल बोलणार नाही तर मग कुठे बोलणार, असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. अमरावतीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांच्या प्रचारासभेत त्या बोलत होत्या. हे. ज्यांची सत्ता केंद्रात नाही अशा पक्षाच्या उमेदवारांना मत देऊन कुठलाही उपयोग होणार नाही. ते विकासही करू शकत नाहीत असेही त्या म्हणाल्या.
अमरावती - 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. असे असतानाही हे लोक सुधरले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कलम 370 चा विषय महाराष्ट्रात काय कामाचा, असे विचारत आहेत. खरंतर ज्या महाराष्ट्राने देशाला स्वराज्याची परिभाषा शिकवली त्या महाराष्ट्रात कलम 370 बद्दल बोलणार नाही तर मग कुठे बोलणार, असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. अमरावतीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांच्या प्रचारासभेत त्या बोलत होत्या.
सभेला संबोधित करताना स्मृती इराणी म्हणाल्या, "आता दिवाळी आहे. दिवाळीत जशी घराची सफाई केली जाते. अगदी तशीच सफाई महाराष्ट्रातून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची करून टाका. दिवाळीत प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी येणार आहे, आणि ही लक्ष्मी कमळावर स्वार होऊनच येईल. देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस विकासाचा सेतू बांधत आहेत. या विकासाच्या सेतूला अमरावतीशी जोडण्यासाठी डॉ. सुनील देशमुख यांना अमरावतीकरांनी साथ द्यावी.आता घड्याळ बंद पडली आहे. ज्यांची सत्ता केंद्रात नाही अशा पक्षाच्या उमेदवारांना मत देऊन कुठलाही उपयोग होणार नाही. ते विकासही करू शकत नाहीत"
हेही वाचा - बडनेरा मतदारसंघात... 'राणा को हटाओ राणी को लाओ'च्या घोषणा!
अमरावतीच्या विकासाची खरी नस डॉक्टरांना कळली असून अमरावतीकरांनी डॉ. सुनील देशमुख यांना पुन्हा एकदा संधी देऊन अमरावतीचा विकास साधावा, असे आवाहन स्मृती इराणी यांनी उपस्थितांना केले. यावेळी डॉ. सुनील देशमुख यांच्यासह बडनेरा मतदार संघाच्या युतीच्या उमेदवार प्रिती बंड, माजी खासदार आनंद अडसूळ आदी उपस्थित होते.
Body:अमरावतीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी यांची शुक्रवारी सायंकाळी भाजी बाजार चौक येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. सुनील देशमुख यांच्यासह बडनेरा मतदार संघाच्या युतीच्या उमेदवार प्रिती बंड आणि माजी खासदार आनंद अडसूळ प्रामुख्याने उपस्थित होते.
सभेला संबोधित करताना स्मृती इराणी म्हणाल्या, आता दिवाळी आहे. दिवाळीत जशी घराची सफाई केली जात आहे. अगदी तशीच सफाई महाराष्ट्रातून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची करून टाका. आता दिवाळी आहे दिवाळीत प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी येणार आहे आणि ही लक्ष्मी मी कमळावर स्वार होऊनच येईल येईल असे मूर्ती राणे यांनी म्हणतात उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला .
देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस विकासाचा सेतू बांधत आहे या विकासाच्या सेतूला अमरावतीशी जोडण्यासाठी डॉ. सुनील देशमुख यांना अमरावतीकरांनी साथ द्यावी.आता घड्याळ बंद पडली आहे. ज्यांची सत्ता केंद्रात नाही अशा पक्षाच्या उमेदवारांना मत देऊन कुठलाही उपयोग होणार नाही. ते विकासही करू शकत नाही. अमरावतीच्या विकासाची खरी नस अमरावतीच्या डॉक्टरांना कळली असून अमरावतीकरांनी डॉ. सुनील देशमुख यांना पुन्हा एकदा संधी देऊन अमरावतीचा विकास साधावा. असे आवाहनही स्मृती इराणी यांनी केले.
Conclusion: