ETV Bharat / state

अमरावती : भिवापूर येथे रेस्क्यू ऑपरेशन; पुरात अडकलेल्या सहा जणांना काढले सुखरूप काढले बाहेर

तिवसा तालुक्यातील भिवापूर येथील तलावात पूर आल्याने सहा जण पुरात अडकले होते. या ठिकाणी रात्रभर मदतकार्य सुरू होते.

author img

By

Published : Sep 9, 2021, 10:32 PM IST

amravati latest news
amravati latest news

अमरावती - जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले एकत्र झाले आहेत. तर तिवसा तालुक्यातील भिवापूर येथील तलावात पूर आल्याने सहा जण पुरात अडकले होते. या ठिकाणी रात्रभर मदतकार्य सुरू होते. रेस्क्यू टीमने रात्री दोघांना बाहेर काढले, तर चार जणांना तब्बल 15 तासांनी आज सकाळी रेस्क्यू टीमने बाहेर काढले.

व्हिडीओ

चार जणांना 15 तासांनी काढले बाहेर -

अमरावती येथील काही पर्यटक तिवसा तालुक्यातील भिवापूर येथे आले होते. मात्र, अचानक मुसळधार पावसामुळे ते काल दुपारी 4 वाजेपासून ते भिवापूर तलावात मधोमध अडकले होते. यातील सहा जणांपैकी दोघांना रात्रीच सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. उर्वरित अडकलेल्या चार जणांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर प्रयत्न चालवले. मात्र, मुसळधार पावसामुळे मदत कार्य करण्यास मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला. त्यामुळे सकाळी 6 वाजता पुन्हा मदत कार्य सुरु करत पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन करत चार जणांना 15 तासांनी बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा - आमदार नितेश राणे अन् त्यांच्या मातोश्री नीलम राणे यांच्याविरोधात 'लूकआउट नोटीस' जारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.