ETV Bharat / state

अंत्ययात्रेत सहभागी 6 जण क्वारंटाईन; नगर परिषदेकडून परिसरात निर्जंतुकीकरण - अमरावती बातमी

अमरावती व धामणगाव रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त पथकाने त्या कुटुंबातील 6 जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठवले आहे. आज त्यांचे थ्रोट स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत, तर सदर घटनेचे वृत्त कळताच आज नगरपालिका प्रशासनाने लगेच सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे.

अंत्ययात्रेत सहभागी 6 जण क्वारंटाईन; नगर परिषदेकडून परिसरात निर्जंतुकीकरण

author img

By

Published : May 1, 2020, 3:50 PM IST

अमरावती - शहरातील कंवरनगर येथील एका कोरोनाबधिताच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या धामणगाव रेल्वे येथील 6 जणांना काल रात्री तडकाफडकी क्वारंटाईन करण्यात आले आले आहे. दुसरीकडे नगरपरिषदेनेसुद्धा तातडीने दखल घेत सदर परिसर सॅनिटाईज केला असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढतच चालला असून येथील कंवरनगर परीसरात राहत असलेल्या एका कोरोनाबधिताचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला होता. सदर मृत रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री शोधताना सदर रुग्णाच्या भेटीकरिता तसेच अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी धामणगाव रेल्वे येथील सिंधी कॉलनी परिसरातील एक कुटुंब गेले असल्याचे उघडकीस आले.

अंत्ययात्रेत सहभागी 6 जण क्वारंटाईन; नगर परिषदेकडून परिसरात निर्जंतुकीकरण
अंत्ययात्रेत सहभागी 6 जण क्वारंटाईन; नगर परिषदेकडून परिसरात निर्जंतुकीकरण

काल मध्यरात्री अमरावती व धामणगाव रेल्वे प्रशासनाच्या संयुक्त पथकाने त्या कुटुंबातील 6 जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठवले आहे. आज त्यांचे थ्रोट स्वॅब तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत, तर सदर घटनेचे वृत्त कळताच आज नगरपालिका प्रशासनाने लगेच सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे.

प्रशासनाने घेतली तातडीची बैठक -
धामणगाव रेल्वे शहरात कंवरनगरचे कनेक्शन उघडकीस येताच संपूर्ण प्रशासन सक्रिय झाले आहे. तहसीलदार भगवान कांबळे यांनी लगेच मुख्याधिकारी सुमेध अलोने तालुका वैद्यकीय अधिकारी हर्षल क्षीरसागर, वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक ग्रामीण रुग्णालयात आयोजित करून परिस्थितीजन्य उपाययोजनांविषयी चर्चा केली. परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असून प्रशासन प्रत्येक घडामोडीवर बारिक लक्ष ठेवून आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये : तहसीलदार कांबळे
परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्यातरी कोणतीही काळजी करण्याचे कारण नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घरीच सुरक्षित राहावे, असे आवाहन तहसीलदार भगवान कांबळे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.