ETV Bharat / state

तूर खरेदीसाठी सहा केंद्रे; नोंदणी करण्याचे पणन विभागाचे आवाहन - amravati pigeon pea purchase news

नाफेडच्यावतीने तुर खरेदीसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून शेतकऱ्यांनी तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क साधून आपल्या तुरीची नोंदणी करावी, असे आवाहन पणन विभागाने केले आहे.

six centers for purchase of pigeon pea  in amravati
तूर खरेदीसाठी अमरावती जिल्ह्यात सहा केंद्रे; तुरीची नोंदणी करण्याचे पणन विभागाचे आवाहन
author img

By

Published : Jan 19, 2021, 5:49 PM IST

अमरावती - केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्यावतीने खरीप हंगाम 2020-21 या वर्षात तूर नोंदणी 28 डिसेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यात सहा खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले असून शेतकऱ्यांनी तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क साधून आपल्या तुरीची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी के. पी. धोपे यांनी केले आहे.

प्रतिनिधीचा रिपोर्ट

पणन विभागाने केल्या विविध सुचना -

शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी खरीप हंगाम 2020 मधील पिकपेरा नोंद असलेल्या तलाठ्याचा सही शिक्का, ऑनलाईन सातबारा, आधार कार्ड, बँक पासबूक खरेदी केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच बँक पासबूकवर शेतकऱ्याचे नाव व बॅंक खाते क्रमांकासह आयएफसी कोड नमूद असावा, तसेच जनधन खाते किंवा परिसंस्थेतील खाते क्रमांक सादर करू नये, अशा सूचनाही पणन विभागाने दिल्या आहेत. खरेदी केंद्र असलेल्या तालुक्यातील व तालुक्याच्या जोडलेल्या खरेदी केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहनही महासंघाने केले आहे.

हेही वाचा - कृषी आंदोलन : शेतकऱ्यांसोबत चर्चेची दहावी फेरी सरकारने पुढे ढकलली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.