ETV Bharat / state

खासदार राणा जात वैधता प्रमाणपत्र प्रकरण : अमरावतीत शिवसैनिकांचा जल्लोष - Amravati breaking news

खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय येताना अमरावतीतील शिवसैनिकांनी राजकमल चौक येथे जल्लोष केला.

जल्लोष करताना
जल्लोष करताना
author img

By

Published : Jun 8, 2021, 4:35 PM IST

Updated : Jun 8, 2021, 5:24 PM IST

अमरावती - खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय येताच अमरावतीत शिवसैनिकांनी राजकमल चौक येथे ढोल-ताशे वाजवत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

बोलताना सुनील खराटे

सात वर्षांचा लढा

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून अनुसूचित जातीसाठी आरक्षित आणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघात उमेदवार असणाऱ्या नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे आल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यावेळी खासदार असणारे शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या वतीने त्यांचे स्वीय सचिव सुनील भालेराव यांनी नावनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. 2014 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव होऊन आनंदराव अडसूळ निवडून आले होते. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत पुन्हा नवनीत राणा अमरावती मतदार संघात उमेदवार होत्या. आनंदराव अडसूळ सलग 7 वर्षांपासून नवनीत राणा यांच्या अवैध जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रकरणात उच्च न्यायालयात लढत होते. आज सात वर्षांनंतर आनंदराव अडसूळ यांच्याबाजूने निकाल लागल्याने आम्ही जल्लोष साजरा केला, असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे म्हणाले.

राजकमल चौकात फटाक्यांची आतषबाजी

शिवसैनिकांनी राजकमल चौकात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. सुनील भालेराव यांच्यासह जिल्ह्याच्या सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर, माजी उपमहापौर रामा सोळंके यांच्यासह शेकडो शिवसैनिक या जल्लोषात सहभागी झाले.

हेही वाचा - जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Last Updated : Jun 8, 2021, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.