ETV Bharat / state

आज फोटोला चपलांचा हार घातलांय.. उद्या तुमच्या गळ्यातही घालू; शिवसैनिकांचा रवी राणांना इशारा

दोन दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना राज्यातील अनेक प्रश्नाबाबत विचारणा केली. एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकरने केलेल्या आत्त्महत्येविषयी आमदार रवी राणा यांनी प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावण्याची घोषणा केली. तसेच मुख्यमंत्र्यांबद्दस आक्षेपार्ह विधान केले होते.

शिवसैनिकांचा रवी राणांना इशारा
शिवसैनिकांचा रवी राणांना इशारा
author img

By

Published : Jul 12, 2021, 10:02 AM IST

अमरावती- आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावण्याची घोषणा केली होती. मात्र, आमदार रवी राणांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आधी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर झाड लावून दाखवावे, नंतर मातोश्रीवर झाड लावण्याच्या बाता माराव्यात, असा इशारा देत परतवाडा येथील शिवसैनिकांनी रवी राणा विरोधात आंदोलन केले. रविवारी करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी आमदार रवी राणा यांच्या फोटोला चपलांचा हार घातला. तसेच आज फक्त फोटोला हार घातला, उद्या तुमच्या गळ्यात चपलांचा हार घालायला शिवसेना मागेपूढे पाहणार नाही, असा इशाराही परतवाडा शहरातील शिवसैनिकांनी आमदार रवी राणा यांना दिला आहे.

शिवसैनिकांचा रवी राणांना इशारा

आमदार रवी राणा खासदार नवनीत राणा हे सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मागील अनेक महिन्यापासून टीकेची झोड उठवत आहेत. दोन दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना राज्यातील अनेक प्रश्नाबाबत विचारणा केली. एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकरने केलेल्या आत्त्महत्येविषयी आमदार रवी राणा यांनी प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावण्याची घोषणा केली. तसेच मुख्यमंत्र्यांबद्दस आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून आमदार रवी राणा यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. तर राज्यभरात ठिकठिकाणी आमदार रवी राणा यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली.

केद्रात मंत्री पद मिळण्याच्या आशेनेच शिवसेनेवर टीका -

आमदार रवी राणा यांच्या विरोधात परतवाडा येथील आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आंदोलना दरम्यान राणा दाम्पत्यावर सडकडून टीका केली आहे. केंद्रात नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला, ज्याप्रकारे राज्यातील चार नेत्यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले. केंद्राने विशेषत: शिवसेनेला टारगेट करण्यासाठी नारायण राणे, कपिल पाटील यांना मंत्रिपदाचे बळ दिले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, त्याच पद्धतीने खासदार राणा यांना आपल्यालाही मंत्रीपद मिळेल या आशेने आमदार रवी राणा आणि नवनीत राणा हे मुख्यमंत्र्यांवर टीका करत असतात, असा आरोप देखील शिवसैनिकांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.