ETV Bharat / state

शिवजयंतीनिमित्त अमरावतीत भव्य मिरवणूक - Chh Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्या वतीने अमरावतीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. गांधी चौक, राजकमल चौक, जयस्तंभ, जवाहर गेट येथून निघालेली मिरवणूक गांधी चौकात येऊन विसर्जित झाली.

शिवजयंतीची मिरवणूक
author img

By

Published : Mar 23, 2019, 10:09 PM IST

अमरावती - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्या वतीने अमरावतीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. खासदार आनंदराव अडसूळ यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर गांधी चौक येथून ही मिरवणूक निघाली.

शिवजयंतीची मिरवणूक

अश्वावर स्वार बालशिवाजीच्या वेशातील चिमुकले, ढोल, ताशे, लेझीम पथक यासह विविध देखावे या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. राजकमल चौक येथे मिरवणुकीवेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रशांत वानखडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी ढोलताशांच्या तालावर ठेका धरला. गांधी चौक, राजकमल चौक, जयस्तंभ, जवाहर गेट येथून निघालेली मिरवणूक गांधी चौकात येऊन विसर्जित झाली.

मिरवणुकीत दिनेश बूब, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने, प्रविण हारामकर, राहुल माटोडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Intro:छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अमरावतीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. खासदार आनंदराव अडसूळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर शिवसेनेच्या वतीने गांधी चौक येथून मिरवणूक शहरात निघाली.

Body:अश्वावरस्वार बालशिवजीच्या वेशातील चिमुकले,ढोल, ताशे, लेझिम पथक यासह विवध देखावे या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. राजकमल चौक येथे मिरवणुकीदरम्यान फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे शहर अध्यक्ष प्रशांत वानखडे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी ताशांच्या नादवर ताल धरला. गांधीचौक, राजकमल चौक, जयस्तंभ, जवाहर गेट येथून निघालेली मिरवणूक गांधी चौकात येऊन विसर्जित होणार आहे. या मिरवणुकीत दिनेश बूब, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने, प्रवीण हारामकर, राहुल माटोडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत.. मिरवणुकीदरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.