ETV Bharat / state

केंद्रात कृषी विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा- केंद्रीय मंत्री संजय धोत्रे - Agriculture Bill Shiv Sena support

दीड महिना विधेयकाबाबत चर्चा सुरू होती. तेव्हा मात्र कुणी चकार शब्द काढला नाही. शेवटी शिवसेना तर आमच्यासोबत होतीच. त्यांनी या विधेयकाचे कौतुक केले, असे केंद्रीय मंत्री संजय धोत्रे म्हणाले.

केंद्रीय मंत्री संजय धोत्रे
केंद्रीय मंत्री संजय धोत्रे
author img

By

Published : Oct 4, 2020, 7:15 PM IST

अमरावती- तीनही कृषी विधेयकांना केंद्रात शिवसेनेने पाठींबा दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी आज दिली. अमरावती येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

माहिती देताना केंद्रीय मंत्री संजय धोत्रे

राज्यात विधेयकाला पारित करण्याचे निर्देश पणन महासंघाच्या सचिवांनी दिले आहेत. त्यावर कोणी एक शब्दही बोलले नाही. परंतु, जेव्हा संसदेत विधेयक पारित झाले, तेव्हा काँग्रेसने विरोधाला सुरुवात केली. त्यानंतर मग एका आमदाराने जी तक्रार केली. त्यावर सहकार मंत्री यांनी ताबडतोब कृषी कायद्याला स्थगिती दिली, असेही केंद्रीय राज्य मंत्री संजय धोत्रे म्हणाले.

दीड महिना विधेयकाबाबत चर्चा सुरू होती. तेव्हा मात्र कुणी चकार शब्द काढला नाही. शेवटी शिवसेना तर आमच्यासोबत होतीच. त्यांनी या विधेयकाचे कौतुक केले, असे केंद्रीय मंत्री संजय धोत्रे म्हणाले. दरम्यान, कोरोनाविषयी बोलताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने सर्व राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून माहिती घेत असतात. तसेच, सर्वाधिक रुग्ण संख्या ही महाराष्ट्र राज्यात असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सांगितले.

हेही वाचा- अमरावतीच्या छत्री तलाव परिसरात बिबट्याचे दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.