अमरावती : कृषी केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध नसल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक राहुल माटोडे आणि सुनील राऊत यांच्याकडे केली. यामुळे राहुल माठोडे सुनील राऊत आणि शहरातील उद्योजक नितीन मोहोळ यांनी शहरात कृषी केंद्र असणाऱ्या परिसरात जाऊन गोंधळ घातला. कृषी समृद्धी या कृषी केंद्राचे संचालक राठी यांच्याशी हुज्जत घालत सुनील राऊत यांनी चक्क त्यांना मारहाण केली. या संपूर्ण प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार : कृषी केंद्र संचालकाला मारहाण झाल्यामुळे शहरातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी आपली दुकान बंद करून, थेट शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठले. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त विक्रम साळी हे शहर कोतवाली पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांच्या वतीने यावेळी खबरदारी घेण्यात आली. समृद्धी कृषी केंद्राचे संचालक राठी यांनी झाल्या प्रकाराबाबत शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकारात राहुल माटोडे सुनील राऊत आणि नितीन मोहोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कृषी केंद्र संचालक युरियाचा काळाबाजार केला जात आहे. कृषी केंद्रात युरिया खरेदी करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून पैशांची लूट केली जात आहे. यापुढे शेतकऱ्यांची अशीच लुबाडणूक करण्यात आली तर हे कृषी केंद्र संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांची धिंड काढणार - राहुल माटोडे
असा आहे शिवसैनिकांचा आरोप : बळीराजा हतबल असताना सरकार त्यांच्या त्यांच्या प्रति अस्ववेदनशील असून, अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कृषी केंद्र संचालक युरियाचा काळाबाजार करीत आहेत. कृषी केंद्रात युरिया खरेदी करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून पैशांची लूट केली जात आहे. असा आरोप शिवसेनेचे राहुल माटौडे यांनी केला आहे. युरियाची मूळ किंमत ही 283 रुपये असून 400 ते 500 रुपये दराने त्याची विक्री करून शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जात आहे. काही दिवसांपूर्वी अमरावती शहरात खोटे बी बियाणे पकडले गेले. या सर्व प्रकाराची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे साठे-लोटे आहे. या गैरप्रकारचा संबंध थेट कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी असल्याचा आरोप केला जात आहे. कृषी केंद्र संचालकांना धडा शिकवण्यासाठी त्यांना चोप दिला. यापुढे शेतकऱ्यांची अशीच लुबाडणूक करण्यात आली तर हे कृषी केंद्र संचालक आणि कृषी अधिकाऱ्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा, देखील राहुल माटोडे यांनी यावेळी दिला.
हेही वाचा -
- Jayant Patil Criticised बोगस बियाणे विकणाऱ्यांना कोणाची साथ जयंत पाटील यांचा सरकारला सवाल
- Compensation To Farmers शेतपिकांच्या नुकसानीकरता १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५०० कोटी नुकसान भरपाई तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार
- Nanded Crime News पेरणीच्या तोंडावर बोगस सोयाबीन बियाण्यासह 99 लाखांचा मुद्देमाल जप्त बनावट कंपनी विरोधात गुन्हा नोंद