ETV Bharat / state

भारतात इंधनदर ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता - शैलेंद्र देवळाणकर - पेट्रोल

कच्च्या तेलाच्या किंमतीत 55 डॉलरवरून 35 डॉलरपर्यंत घसरण झाल्यामुळे इंधनदर 5 रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता असल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.

शैलेंद्र देवळणाकर
शैलेंद्र देवळाणकर
author img

By

Published : Mar 12, 2020, 2:15 PM IST

Updated : Mar 12, 2020, 2:29 PM IST

अमरावती - तेलाच्या किंमतीवरून सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यामध्ये तेलाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी जे युद्ध सुरू आहे. त्या अंतर्गत सौदी अरेबियाने तेलाच्या किमती या पंचवीस टक्क्यांनी कमी केल्या आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी झाल्या आहे. 55 डॉलरमध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती आज 35 डॉलरवर येऊन थांबली आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 5 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे, असे मत आंतरराष्ट्रीय विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले आहे.

बोलताना शैलेंद्र देवळाणकर

सौदी अरेबिया हा भारताला पेट्रोल, डिझेल पुरवणारा देश आहे. त्यामुळे किंमती कमी होण्याचा परिणाम आपल्या देशावर दिसून येईल. तेलाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर सौदी अरेबियाने वाढवले आहे. त्याचा परिणाम देखील आपल्याला तेलाच्या किंमतीच्या माध्यमातून दिसून येईल.

जोपर्यंत सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यात तेलाच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी आणि तेल उत्पादन किती करावे या संदर्भात करार होत नाही. तोपर्यंत तेलाच्या किंमती अशाच कमी होतील. कारण, सौदी अरेबियाला तेलाची बाजारपेठ रशियाला काबीज करू द्यायची नाही. तेलाचा उत्पादन ओपेक्स संघटनेने कमी करायचे ठरवले होते. त्याला रशियाची मान्यता नाही. ओपेक्स संघटनेबरोबर रशिया करार करत नाही, तोपर्यंत अशा प्रकारची अस्थिर परिस्थिती ही राहणार आहे. त्यामुळे रशियावर त्यांचा दबाव वाढावा यासाठी सौदी अरेबिया आगामी काळात तेलाच्या किंमतीत आणखी सूट देऊ शकते. याचा फायदा भारताला होईल, असेही देवळाणकर म्हणाले.

हेही वाचा - अमरावतीत अज्ञात व्यक्तींचा वकिलाच्या वाहनावर हल्ला

Last Updated : Mar 12, 2020, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.