ETV Bharat / state

अधीक्षक अभियंत्याची उपकार्यकारी अभियंत्याला अपमानास्पद वागणूक? तिवसा वीज कार्यालयातील प्रकार - अनिल वसुले

अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी तिवसा अभियंता अनिल वसुले यांना तुम्ही पदाच्या लायक नाही. तुम्ही घरी जा असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली.

अधीक्षक अभियंत्याची उपकार्यकारी अभियंत्याला अपमानास्पद वागणूक
author img

By

Published : Aug 25, 2019, 6:08 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील तिवसा वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता अनिल वसूले यांना अधीक्षक अभियंत्याने कार्यालयात येऊन अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणानंतर उपकार्यकारी अभियंता दोन महिन्याची रजा टाकून रजेवर गेले आहेत. याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून घडलेला प्रकार सांगितला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिवसा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ४ जुलैला उपकार्यकारी अभियंता म्हणून अनिल वसुले यांची नियुक्ती झाली. महिन्याभराच्या कालावधीत त्यांनी ग्राहकांकडील ७० टक्के थकबाकीची वसुली केली. अनिल वसूले यांची काम करण्याची पद्धत उत्तम होती, अशी चर्चा आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अमरावती येथून अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे हे तिवसा वीज वितरण कार्यालयात आले. या दरम्यान तिवसा वीज अभियंता अनिल वसूले हे मोझरी येथील विज वितरण कार्यालयात होते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आल्याने अनिल वसुले काही वेळातच तिवसा कार्यालयात हजर झाले.

या दरम्यान कार्यालयात येताचक्षणी अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे यांनी तिवसा अभियंता अनिल वसुले यांना तुम्ही पदाच्या लायक नाही. तुम्ही घरी जा असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप अनिल वसूले यांनी पत्रात केला आहे. त्यामुळे तिवसा अभियंता अनिल वसूले यांनी वरिष्ठांना पत्र लिहून रजेवर गेले आहे.

दरम्यान, तिवसा कार्यालयात बसण्यासाठी स्वखर्चाने आणलेली खुर्ची ते सोबत घरी घेऊन गेले. शनिवारी सकाळी ते कार्यालयात आले असता, त्यांनी आपल्या खुर्चीवर न बसता दुसऱ्या खुर्चीवर बसून कामकाज केले.

Intro:अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील वीज अभियंत्याला अधीक्षक अभियंत्याने दिली अपमानास्पद वागणूक

तिवसा विज अभियंत्याचा जिल्हा अधिक्षक अभियंत्यावर आरोप

तुम्ही पदाच्या लायक नाही तुम्ही घरी जा.. अधीक्षक अभियंताने सुनावले

अमरावती अँकर
विज वितरण क्षेत्रात दांडगा अनुभव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे नव्याने कार्यान्वित असलेल्या तिवसा विज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता अनिल वसूले यांना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास अमरावती वरून आलेल्या अधीक्षक अभियंत्याने कार्यालयात येऊन अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे, यात तिवसा अभियंता अनिल शुक्रवारी दोन महिन्याची रजा टाकत रजेवर गेले आहे याबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्र लिहत घडलेला प्रकार पत्रात नमूद केला आहे
प्राप्त माहितीनुसार तिवसा विज वितरण कंपनीच्या कार्यालयात४जुलै२०१९रोजी उपकार्यकारी अभियंता म्हणून अनिल वसुले यांची नियुक्ती झाली यात या महिन्याभराच्या कालावधीत त्यांनी रिक्त असलेली ग्राहकांकडील ७०टक्के वसुली करून घेतली त्यामुळे अनिल वसूले यांची काम करण्याची पद्धत उत्तम होती अशी चर्चा आहे,मात्र शुक्रवारी सकाळी१०.३०वाजताच्या सुमारास अमरावती येथून अधीक्षक अभियंता श्री.खांनदे हे तिवसा विज वितरण कार्यालयात आले या दरम्यान तिवसा वीज अभियंता अनिल वसूले हे मोझरी येथील वीज वितरण कार्यालयात होते मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन असल्याने अनिल वसुले काही वेळातच तिवसा कार्यालयात हजर झाले,मात्र या दरम्यान कार्यालयात येताच क्षनी अधीक्षक अभियंता श्री.खांंनदे यांनी तिवसा अभियंता अनिल वसुले यांना तुम्ही पदाच्या लायक नाही, तुम्ही घरी जा असे म्हणून अपमानास्पद वागणूक दिली असल्याचा आरोप अनिल वसूले यांनी पत्रात केला आहे त्यामुळे तिवसा अभियंता अनिल वसूले यांनी दि.२४/८/२०१९रोजी ते२३/१०/२०१९पर्यंत रजा टाकून वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहत माहिती दिली,

तिवसा अभियंता अनिल वसूले शनिवार पासून दोन महिन्याच्या रजेवर गेले दरम्यान त्यांनी आपल्याला तिवसा कार्यालयात बसण्यासाठी स्वखर्चाने आणलेली खुर्ची सोबत घरी घेऊन गेले व शनिवारी सकाळी ते कार्यालयात आले असता त्यांनी आपल्या खुर्चीवर न बसता दुसऱ्या खुर्च्यावर बसून त्यांनी शासकीय कामकाज केलेBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.