अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन अर्थात नुटाने पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत नुटाच्या विरोधात असणाऱ्या शिक्षण मंचचा दारुण पराभव झाला आहे.
38 पैकी 31 जागांवर नुटाचा विजय: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटमध्ये प्राचार्य मतदारसंघात एकूण 9 जागांपैकी 7 जागांवर नुटाचे सदस्य विजयी झाले आहेत. शिक्षक मतदार संघातील एकूण 10 जागा पैकी 8 जागा नुटाने जिंकले आहेत. विद्यापीठ शिक्षक या संवर्गात देखील तिन्ही जागांवर नुटाने विजय मिळवला आहे. तर पदवीधर मतदार संघात 10 पैकी सात जागा जिंकून नुटाने सिनेट निवडणुकीत एकूण 38 जागांपैकी 31 जागा मिळवून विजयाची परंपरा कायम राखली आहे.
शिक्षण मंचचा सफाया: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 2016 च्या सिलेक्ट निवडणुकीत नोटाच्या विरोधात भाजप प्रणित शिक्षण मंच उभे ठाकले होते. या निवडणुकीत नोटाला 19 जागांवर समाधान मानावे लागले होते. या निवडणुकीत मात्र शिक्षण मंचचा पुरता सफाया झाला आहे. शिक्षण मंचचे प्रदेश अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर यांचा शिक्षक मतदार संघात सर्वसाधारण मतदार संवर्गात नुटाचे सुभाष गावंडे यांनी एकूण 800 मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे शिक्षण मंचाचे प्रमुख प्राध्यापक प्रदीप खेडकर यांनी विद्यापीठात एककल्ली कार्यक्रम राबविल्यामुळे त्यांच्या शिक्षण मंचमधील अनेक सदस्य त्यांच्यावर नाराज होते. व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापकिनी सूर्यवंशी यांनी प्राध्यापक प्रदीप खेडकर यांचे भ्रष्टाचार सलग 4 वर्षांपासून सातत्याने उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला होता.
निवडणुकीत केवळ 7 जागांवर समाधान: शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात या निवडणुकीत आघाडी असली, तरी शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील अनेकांना प्राध्यापक प्रदीप खेडकर यांचे एककल्ली वागणे मान्य नसल्यामुळे त्यांना स्वतःच्या संघटनेतूनच फटाके लावण्यात आले. याचा परिणाम संपूर्ण संघटनेवर झाला असून शिक्षण मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या आघाडीला या निवडणुकीत केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले.
मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: नुटा संघटना ही पारंपारिक 60 वर्षापासून नागपूर विद्यापीठामध्ये आणि अमरावती विद्यापीठामध्ये कार्यरत आहे. आमच्या संघटनेने भरगोस अशी मतं मिळवलेलं आहे. एकंदरीत 38 जागांपैकी सिनेटमध्ये 31 जागा आम्ही जिंकल्या आहेत. आणि अकॅडमीत कौन्सिलमध्ये 100 टक्के यश म्हणजे पूर्ण 7 जागा जिंकून नुटाने आज मोठे यश संपादित केले आहे. आणि मला विश्वास आहे की, या अमरावती विद्यापीठाच्या सर्व शिक्षकांनी जो एक विश्वास नुटावर दाखवला त्या विश्वासात आम्ही तडा पडू देणार नाही. आणि अत्यंत व्यावसायिक हित जोपासण्यासाठी संघटनेचे सर्व उमेदवार जिंकून आलेले आहेत आम्ही सर्व सभागृहामध्ये उत्कृष्ट काम करू, असा विश्वास नोटाचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला आहे.
विजयी उमेदवारांचा जल्लोष: नूटाने या निवडणुकीत मोठे यश संपादन केल्यावर नुटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. पदवीधर मतदार संघात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि शिक्षण मंच या आघाडीचे अनुसूचित जातीचे उमेदवार प्रताप अभ्यंकर आणि अनुसूचित जमाती संवर्गात रितेश कुळसाम यांच्या विजयाची घोषणा होताच, त्यांच्या समर्थकांनी विद्यापीठ परिसरात ढोल ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला.
हे आहेत विजयी उमेदवार: प्राचार्य मतदारसंघ, डॉक्टर सुभाष गवई- शिक्षण मंच, डॉक्टर विजय नागरे- नुटा, डॉक्टर अंबादास कुलट- नुटा, डॉक्टर आराधना वैद्य- नुटा, डॉक्टर राधेश्यामसिकची- नुटा
व्यवस्थापन परिषद: डॉ. मीनल गावंडे नुटा, हर्षवर्धन देशमुख नुटा, डॉ.अशोक चव्हाण शिक्षण मंच, मोतीसिंह मोहता शिक्षण मंच
दहा शिक्षक मतदार संघ: डॉक्टर रवींद्र मुंदे नुटा, हरिदास धुर्वे नुटा, प्रा. विजय कापसे नुटा, सुभाष गावंडे नुटा, अर्चना बोबडे नुटा, जागृती बारब्दे नुटा, डॉ. प्रवीण रघुवंशी नुटा, प्रा. भैय्यासाहेब मेटकर नुटा, डॉ. संतोष बनसोड शिक्षण मंच, डॉ. संतोष कुटे, डॉ. प्रशांत विघे नुटा, डॉ. सावंत देशमुख नुटा, पदवीधर मतदार संघ, मयुरी जवंजाळ नुटा, प्रताप अभ्यंकर- शिक्षण मंच, कैलाश चौहाण- नुटा