ETV Bharat / state

Senate Election: अमरावती विद्यापीठाच्या सिनेट मतदान प्रक्रियेत घोळ; अनेक प्राध्यापक मतदानाच्या हक्कापासून वंचित

author img

By

Published : Nov 20, 2022, 1:23 PM IST

Senate Election: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. दरम्यान पदवीधर मतदार संघासाठी मतदान करणाऱ्या प्राचार्य आणि संस्थाचालक संवर्गात सुरू असणाऱ्या मतदानापासून अनेक प्राध्यापकांना वंचित राहावे लागत असल्यामुळे हा गंभीर घोळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Senate Election
Senate Election

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सकाळी 7 वाजल्यापासून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविली जात आहे. दरम्यान पदवीधर मतदार संघासाठी मतदान करणाऱ्या प्राचार्य आणि संस्थाचालक संवर्गात सुरू असणाऱ्या मतदानापासून अनेक प्राध्यापकांना वंचित राहावे लागत आहे. हा गंभीर घोळ असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे.

असा उडतो आहे गोंधळ: अमरावती शहरातील शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय येथे पदवीधर संवर्गासाठी मतदान सुरू आहे, तर शिवाजी शिक्षण महाविद्यालय येथे प्राचार्य आणि संस्थाचालक संवर्गासाठी मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. प्राचार्य आणि संस्थाचालक हे पदवीधर मतदार संघात देखील मतदान करू शकतात. यामुळे ते पदवीधर संवर्गातील मतदानासाठी मतदान केंद्रावर आल्यावर त्यांच्या बोटाला नियमानुसार शाई लावली. त्यांना मतदान करण्यासाठी एकूण 6 संवर्गातील बॅलेट पेपर दिले जात आहे.

अनेक प्राध्यापक मतदानाच्या हक्कापासून वंचित

मतदानासाठी परवानगी नाही: हे बॅलेट पेपर केवळ पदवीधर संवर्गातील आहे. यामध्ये प्राचार्य आणि संस्थाचालकांसाठी असणारे बॅलेट पेपर नसल्यामुळे प्राचार्य आणि संस्थाचालक संवर्गातील मतदार पदवीधरांना मतदान केल्यावर आता प्राचार्य आणि संस्थाचालकांसाठी मतदान करण्यासाठी लगतच्या शिवाजी शिक्षण महाविद्यालयात गेल्यावर या ठिकाणी बोटाला आधीच शाई लागली. त्यांना मतदान करण्यास परवानगी दिली जात नाही.

योग्य माहिती दिली गेली नसल्याने गोंधळ: पदवीधर मतदार संघासाठी श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सकाळपासूनच गर्दी उसळत आहे. या ठिकाणचे वातावरण पाहता प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्थाचालक देखील याच ठिकाणी मतदान करण्यासाठी रांगेत उभे राहत आहे. वास्तवात प्राचार्य आणि संस्थाचालकांना श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय याच ठिकाणी प्राचार्य आणि संस्था चालक संवर्गासोबतच पदवीधरांना देखील मतदानासाठी बॅलेट पेपर उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र याबाबत योग्य माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने दिली, गेली नसल्यामुळे गोंधळ उडत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे निवडणूक प्रमुख डॉ. स्वप्निल पोतदार यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.