अमरावती - कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य विभागासह जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात इशारा दिला आहे. सध्या अमरावतीत जिल्ह्यात 70 ते 80 कोरोना रुग्ण दररोज आढळून यायला लागले आहेत. कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अमरावतीकरांनो सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
'कोरोनाची दुसरी लाट येतेय.. अमरावतीकरांनो सज्ज रहा'
कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज आरोग्य विभागासह जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला असून दुसरी लाट सर्वांनाच महागात पडणार असल्याचा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
अमरावती कोरोना
अमरावती - कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. आरोग्य विभागासह जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात इशारा दिला आहे. सध्या अमरावतीत जिल्ह्यात 70 ते 80 कोरोना रुग्ण दररोज आढळून यायला लागले आहेत. कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक असणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी अमरावतीकरांनो सज्ज व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
Last Updated : Nov 21, 2020, 4:54 PM IST