अमरावती : शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना किचकट वाटणारा विज्ञान हा विषय हसत खेळत आणि केवळ वाचून नव्हे तर प्रयोगाच्या माध्यमातून समजावा आणि विशेष म्हणजे विज्ञान शिकताना आनंद मिळावा. या उद्देशाने राज्यातील सुमारे 200 शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी विज्ञानवारी हा आनंद उपक्रम राबविला जाणार आहे. महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या वतीने या उपक्रमासाठी खास कार्यक्रम आखला आहे.
अमरावती शंभरच्यावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण : शाळेमध्ये जाऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग शिकविण्याची जबाबदारी ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर असून अमरावती शहरात गत दोन दिवसांपासून ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने, 100 च्या वर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण वर्गाला अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळसह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थी देखील सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षणा दरम्यान आम्ही इंग्रजीमध्ये शिकत असणाऱ्या विज्ञान विषयातील अनेक शब्दांचे मराठीतील नावे आम्हाला समजली आहेत. येणाऱ्या नव्या पिढीला आम्ही शाळांमध्ये जाऊन विज्ञानाचे साधे सोपे प्रयोग करून दाखवणार याचा आम्हाला आनंद असल्याची प्रतिक्रिया, वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी मेहत्रे हिने दिली आहे.
महाविद्यालयीन-शाळकरी विद्यार्थ्यांना शिकवणार प्रयोग : ग्रामीण भागात आणि अनेक शहरांमध्ये देखील काही शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत. ज्या शाळांमध्ये प्रयोगशाळा शाळा आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी मिळतेच असे दिसत नाही. या उपक्रमांतर्गत शिक्षकांऐवजी महाविद्यालयीन विद्यार्थी शाळांमध्ये जाऊन प्रत्येक शाळेत 30 ते 40 विद्यार्थ्यांच्या गटाला वैज्ञानिक प्रयोग साध्या पद्धतीने कसे करायचे हे शिकवणार आहेत. यासाठी आम्ही राज्यभरातील काही विज्ञान शाखेच्या महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना या संदर्भात प्रशिक्षण देत आहोत अशी माहिती, मराठी विज्ञान परिषदेच्या या कार्यक्रमाचे समन्वयक प्रकाश मोडक यांनी दिली.
दैनंदिन जीवनात विज्ञानाचा क्षणाक्षणाला विज्ञानाचा उपयोग केला जातो. त्यादृष्टीने आम्ही राज्यातील सहा विभागांमध्ये असणाऱ्या 200 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष करण्याची संधी प्राप्त करून देणार आहोत.साध्या आणि सोप्या पद्धतीने विज्ञान शिक्षण आनंददायी करण्याचा 'शनिवारी विज्ञानवारी' या उपक्रमांतर्गत प्रयत्न असणार आहे. - अभय यावलकर सदस्य
सिद्धांत प्रत्यक्ष पडताळण्याची संधी : शनिवारी विज्ञानवारी या कार्यक्रमांमध्ये एकूण आठ संकल्प असणाऱ्या सत्रांचा समावेश करण्यात आला आहे. शनिवारी संकल्पनांवर आधारित प्रयोग महाविद्यालयीन विद्यार्थी हे शाळकरी विद्यार्थ्या घेणार आहेत. याचा मूळ हेतू विज्ञानाची आवड निर्माण होणे हा आहे. शाळांमध्ये विद्यार्थी विज्ञान हा विषय शिकतात. मात्र प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी मिळत नाही. खरेतर विज्ञानातील जे सिद्धांत आहे ते प्रत्यक्ष पडताळून पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळायला हवी. शनिवारी विज्ञानवारी या उपक्रमांतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष विज्ञानाचे प्रयोग शिकता येतील आणि त्यांच्यात विज्ञानाची आवड आणखी द्विगुणीत होईल असे, मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान अधिकारी अनघा वट्टे म्हणाल्या.
राज्यातील सहा विभागांमध्ये कार्यक्रम : दैनंदिन जीवनात विज्ञानाचा क्षणाक्षणाला विज्ञानाचा उपयोग केला जातो. त्यादृष्टीने आम्ही राज्यातील सहा विभागांमध्ये असणाऱ्या 200 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग प्रत्यक्ष करण्याची संधी प्राप्त करून देणार आहोत. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने विज्ञान शिक्षण आनंददायी करण्याचा 'शनिवारी विज्ञानवारी' या उपक्रमांतर्गत आमचा प्रयत्न असल्याचे, मराठी विज्ञान परिषदेचे स्थायी समिती सदस्य अभय यावलकर यांनी सांगितले.
हेही वाचा -
- Telescope Making Workshop: चला चंद्र तारे बघूया, खगोलप्रेमींकडून छोट्या दुर्बीणची निर्मिती
- National Technology Day 2023 : आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
- Sensor Glasses For Blind People : अंध व्यक्तींसाठी तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी तयार केला सेंसर चष्मा ; बाल वैज्ञानिकांचे अफलातून प्रयोग