ETV Bharat / state

पुन्हा घंटा वाजणार! अमरावती जिल्ह्यातील शाळा सज्ज; आता केवळ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा - अमरावती जिल्ह्या शाळा बातमी

दोन वर्षांपासून बंद असणाऱ्या इयत्ता आठवीपासून दहावीपर्यंतच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाही सज्ज झाल्या आहेत.

amravati School news
amravati School news
author img

By

Published : Sep 26, 2021, 11:52 AM IST

अमरावती - कोरोनामुळे सलग दोन वर्षांपासून बंद असणाऱ्या इयत्ता आठवीपासून दहावीपर्यंतच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अमरावती शहरासह ग्रामीण भागातील शाळाही सज्ज झाल्या आहेत.

प्रतिक्रिया

बंद काळात अनेक शाळांची दुरुस्ती -

शाळा बंद असताना अमरावती शहरासह ग्रामीण भागातील अनेक शाळांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामीण भागातील अनेक शाळांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. तसेच अनेक शाळांची रंगरंगोटीही करण्यात आली आहे. अमरावती शहरातील जिल्हापरिषदेच्या सायन्सकोर या शाळेच्या काही भागात दुरुस्तीचे काम शाळा बंद असतानाच्या काळात पूर्ण करण्यात आले आहे. तसेच शाळेला नवा रंगही देण्यात आला आहे. यासह शहरातील कॅम्प परिसरात असणाऱ्या श्रीराम विद्यालयाने शाळा बंद असतानाच्या काळात अत्याधुनिक प्रयोगशाळा शाळेत निर्माण केली आहे. खापर्डे बगीचा परिसरातील आदर्श शाळेनेदेखील अत्याधुनिक प्रयोगशाळेसह अनेक महत्त्वपूर्ण कामे पूर्ण केली आहेत. अमरावती शहरातील मनीबाई गुजराती हायस्कूल, श्री समर्थ महाविद्यालय, श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय, श्री गणेश दास राठी विद्यालय, ज्ञानमाता हायस्कूल या नामांकित शाळांच्या परिसरात स्वच्छता पाहायला मिळाली.

ग्रामीण भागातील शाळेची मैदानही सुधारली -

कोरोनामुळे शाळा बंद असताना आणि गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शाळांचे मैदान सुसज्ज झाले आहे. हॉलीबॉल, कबड्डी असे खेळ खेळता येईल, यासाठी ग्रामीण भागातील अनेक शाळेत मैदाने तयार करण्यात आली आहेत.

काही भागात मात्र शाळेची दुरवस्था -

कोरोना काळात शाळा बंद असताना अनेक शाळांच्या दुरुस्तीचे काम झाले असले, तरी मेळघाटसह काही भागात शाळांची दुरावस्था असल्याचे चित्र कायम आहे. कोरोनाकाळात शाळा बंद झाल्यावर मेळघाटातील अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये मुख्याध्यापक शिक्षक कोणीही फिरकले नसल्याचे वास्तव आहे, अशा शाळांमध्ये गुराढोरांचे वास्तव्य वाढले आहे.

हेही वाचा - पोस्टातून पत्र येतात त्याप्रमाणे ईडीतून नोटिसा यायला लागल्या - बुलडाण्यात सुप्रिया सुळेंची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.