ETV Bharat / state

शिक्षणापासून वंचित मुलांच्या मार्गात 'महामार्ग', अमरावतीतील शाळेवर फिरवला बुलडोझर - फासे पारधी

समृद्धी महामार्ग या शासनाच्या महत्वकांक्षी प्रकल्पाविरुद्ध आधीच ओरड सुरू आहे. शेतकरी अनेक ठिकाणी अधिग्रहणाला विरोध करत आहेत. पण, सरकार अधिग्रहण रेटत आहे. आता एका शाळेची इमारत या महामार्गाच्या वाटेत आली आहे. वंचित मुलांच्या या शाळेवर महामार्गाचा बुलडोझर फिरला आहे. पाहुयात ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट.

Amravati
'प्रश्नचिन्ह' शाळा
author img

By

Published : Dec 13, 2019, 10:23 AM IST

Updated : Dec 13, 2019, 3:06 PM IST

अमरावती - विकास म्हणजे मोठमोठे महामार्ग, अजस्त्र कारखाने असे समिकरण झाले आहे. हा विकास नाही असे नाही. पण, याच्यासाठी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर बुलडोझर फिरवला जातो तेव्हा, सरकारच्या हेतूवर 'प्रश्नचिन्ह' उभे करणे क्रमप्राप्त ठरते. अमरावतीतील मंगरुळ चव्हाळा येथे असाच प्रकार समोर आला आहे. आदिवासी मुलांच्या 'प्रश्नचिन्ह' या आश्रमशाळेचे अस्तित्व धोक्यात आहे. त्याचे कारण आहे सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग.

समृद्धी महामार्गामुळे शाळेवर बुलडोझऱ फिरवण्यात आला

अमरावती जिल्हातील मंगरुळ चव्हाळा हे छोटेसे गाव. फासे पारधी समुहाची बहुसंख्या असलेल्या या परिसरात शिक्षणाची काही सोय नाही. मतीन भोसले या तरुणाने २०१२ साली या ठिकाणी शाळा सुरू केली. नाव ठेवले 'प्रश्नचिन्ह'. लोकवर्गणी करुन शाळा उभारण्यात आली. आज या शाळेत १८८ मुले मुली शिक्षण घेतात. ज्यात बहुसंख्य मुले फासे पारधी समुहाची आहेत.

'प्रश्नचिन्ह' च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र सरकारचा समृद्धी महामार्ग हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. राज्यातील शहरे जोडली जाऊन विकास साधण्याचा याचा हेतू आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहीत केल्या जात आहेत. या महामार्गाच्या वाटेत ही शाळा आली. २०१७ ला शाळेचे अध्यक्ष मतीन भोसले यांना शासनाची नोटीस मिळाली. भोसलेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अडचण सांगितली. त्यांनी आश्वासनही दिले. पण, काही कारवाई झाली नाही.

दोन दिवसांपूर्वी शाळेच्या काही वर्गखोल्यांवर बुलडोझर चालवण्यात आला. खोल्या पाडताना चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. आता हे विद्यार्थी आभाळाखाली बाके टाकून शिक्षण घेतात. एक तात्पुरता पत्र्याचा निवारा बनवण्यात आला आहे. दोन विहीरीतील पाणी आश्रमशाळेतील मुले वापरायची. त्या विहिरी देखील महामार्गाच्या जागेत गेल्या आहेत.

शाळेला १ कोटींचा दंड
शाळा पाडण्याला संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांनी विरोध केला. तरीही काही खोल्या पाडण्यात आल्या. पण, शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचे सांगून संस्थाचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. १ कोटी ३४ लाखांचे नुकसान झाल्याची नोटीस रस्ते विकास महामंडळाने मतीन भोसले यांना दिली आहे.

समृद्धी महामार्गाला शाळेचा 'अडथळा'
फासे पारधी हा अतिशय गरीब समुह समजला जातो. वर्षानुवर्षे या समुहावर गुन्हेगारीचा शिक्का बसला आहे. भिक मागून गुजरान करण्यात या समुहाची हयात जाते. अशा समुहासाठी शिक्षणाची कवाडे खुली करण्याचा निर्धार मतीन भोसले यांनी केला. या शाळेत १८८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण, आता या शाळेवर महामार्गाची संक्रांत आली आहे. समृद्धी महामार्ग महत्वाचा आहेच. पण, वंचित समुहाची समृद्धी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. प्रश्नचिन्हला नव्या मुख्यमंत्र्यांकडून मदतीची अपेक्षा आहे. याला सरकार काय प्रतिसाद देते हे येणारा काळच ठरवेल.

Intro:स्पेशल पॅकेज स्टोरी

वंचित विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची समृद्धी आणणाऱ्या "प्रश्नचिन्ह" शाळेच्या संस्था चालकालाच कोटींचा दंड

अँकर:- मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावी यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. गाडगे महाराजांनी सुद्धा शिक्षणाचे महत्त्व पटवून देत "विका प्रसंगी घरदार, नका राहु अडाणी र" म्हटले आहे. याच महापुरुषांच्या महाराष्ट्रात अमरावतीतील मंगरुड जवळा येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी फाशी पारधी समाजाच्या प्रश्नचिन्ह शाळेच्या भिंती पाडून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय पाहुयात हा रिपोर्ट

व्हीवो १:- पारधी समाजातील मुलं ही रस्त्यावर भीक मागणारी, दारोदारी फिरणारी अगदी शिक्षणापासून वंचित असलेली. समाजातील वंचित असलेल्या घटकांपैकी एक. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अमरावतीतील मतीन भोसले यांनी मंगरूळ चव्हाळा येथे प्रश्नचिन्ह नावाची शाळा २०१२ साली सुरु केली. शाळा सुरू करण्यासाठी लोकवर्गणी करून पैसे गोळा करण्यात आले. प्रश्नचिन्ह शाळेत विद्यार्थी पहिल्या वर्गापासून तर दहावीपर्यंत शिक्षण घेऊ लागलेत. जवळपास या शाळेमध्ये १८८ फासे पारधी समाजाचे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले. विविध ठिकाणावरून या आश्रम शाळेत शिक्षणाचे धडे घेऊ लागलेत.

बाईट-मतींन भोसले

व्हीवो २:- शिक्षणाच्या प्रवाहात सेमी इंग्लिश चे शिक्षण प्रश्नचिन्ह शाळेत दिले जात असताना २०१७ मध्ये आश्रम शाळा अध्यक्ष मतीन भोसले याना समृद्धी महामार्गात शाळा जानार असल्याची नोटीस मिळाली. त्यामुळे शाळेच्या नावाप्रमाणे त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभ राहील. २०१९ मध्ये शाळेच्या काही वर्गखोल्या पाडत असताना विधाथ्यानी विरोध केला मात्र चिमुकल्याना अपयश आले.

बाईट:- मतीन भोसले (२)

व्हीवो ३:- समृद्धी महामार्गासाठी आश्रम शाळेच्या वर्गखोल्या, वाचनालय पाडण्यात आल्याने,काही विध्यार्थी सध्या शाळेच्या पटांगणात शिक्षण घेतात आहे, तर तात्पुरत्या बनविण्यात आलेल्या वर्गखोल्या मध्ये शिकतात आहे. आपली शाळा तुटल्यामुळे आता पुढच्या शिक्षणाच कसं होणार या विवनचनेमधून विद्यार्थ्यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्यात.

Song:- student song

व्हीवो ४:- तुटक्या वर्गखोलीत सद्या येथील विध्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर भटक्या समाजातील मुलांना प्रश्नचिन्ह शाळेच्या माध्यमातून राहणीमानाचा प्रश्नासोबत शिक्षणाचा सुद्धा प्रश्न सुटला होता. मात्र काळ बदलला आणि आज पुन्हा एकदा फासे पारधी समाजातील मुलांना शिक्षणापासून दूर लोटले जात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.

विद्यार्थी बाईट:- १,२,३,४,

व्हीवो ५:- तोडलेल्या शाळेचे नुकसान पाहता तुटपुंजी मदत दिल्या गेली असल्याचा आरोप सुद्धा भोसले यांनी केला. दरम्यान या प्रश्नावर मतीनं भोसले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन व्यथा मांडलयात मात्र आश्वासनाशिवाय काहीही मिळालं नाही. त्यामुळे प्रश्नचिन्ह शाळेने महामार्गाचे कामकाज बंद पाडले. आणि शाळा बांधून देण्याची मागणी केली त्यावेळी रस्ते विकास महामंडळाकडून कामात अडथळा आणू नये अशी नोटीस दिली काहीच दिवसात महामार्गचे कामकाज करण्याऱ्या एन सी सी कंपनीने काम थांबविल्याने १ कोटी ३४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोटीस दिली.

बाईट:- मतीन भोसले, प्रशचिन्ह अध्यक्ष

व्हीवो ६:- खरंतर शिक्षणापासून वंचित असलेल्या फासे पारधी समाजाला शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी मतीन भोसले यांनी पुढाकार घेतल्यानंतर नवीन आलेलं महा विकास आघाडीचे सरकार या गंभीर विषयाकडे लक्ष देतील का आणि भिक मागुन खाणार्‍या त्याचप्रमाणे रस्त्यावर दारोदारी फिरणाऱ्यामुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्‍यासाठी सरकार नेमकी काय पावले उचलतील हे येणारा काळात ठरणार आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Dec 13, 2019, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.