अमरावती- कोरोना आणि त्यामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीच्या परीक्षा वारंवार रखडत आहे. परंतु आता या विद्यापीठाच्या रखडलेल्या परीक्षांना जूनचा मुहूर्त मिळाला आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत कला वाणिज्य आणि विज्ञान परीक्षांचे ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजनसुद्धा आता विद्यापीठामार्फत करण्यात आले असून आठ जूनपासून परीक्षेला सुरुवात होऊ शकते. तर एकूण 2200 विषयांची ही परीक्षा असणार असून जवळपास पावणेदोन लाख विद्यार्थी या परिक्षेस बसणार आहेत. दरम्यान महाविद्यालयीन स्तरावर परीक्षा होणार आल्याचे संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीच्या परीक्षा विभागातील अधिकारी यांनी सांगितले.
परीक्षा आठ जूनपासून घेण्याचा विद्यापीठाचा विचार
संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावतीच्या हिवाळी सत्र 2020च्या लॉ, फार्मसी आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या आहेत. जवळपास त्याचे सर्व निकालदेखील विद्यापीठाने घोषित केले आहे. मात्र, इतर विषयाच्या रखडलेल्या परीक्षा या आठ जूनपासून घेण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. त्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचा विचार करुनच परीक्षा घेतल्या जाणार आहेत. आठ जूनला परीक्षा सुरू झाल्यास तीस जूनपर्यंत त्या संपणार असून त्याचे वेळापत्रक देखील तयार झाले आहे. एप्रिल महिन्यात परीक्षाचे नियोजन होते, परंतु लॉकडाऊनमूळे ते रखडले होते. दरम्यान आता या परीक्षा होणार असून त्यासाठी एक दिवस आधी प्रश्नपत्रिका महाविद्यालयाला पाठवल्या जाणार आहे.