ETV Bharat / state

Mohan Bhagwat : 'भारताच्या विकासात सिंधी समाजाचा अतिशय मोलाचा वाटा, देशात सिंधी विद्यापीठ व्हावे' - Sindhi University

भारताच्या विकासात सिंधी समाजाचा अतिशय मोलाचा वाटा आहे. सिंधी संस्कृती आणि भाषा टिकून राहावी यासाठी देशात सिंधी विद्यापीठ व्हावे अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही. देशात निश्चितपणे सिंधी विद्यापीठ व्हावे ( Mohan Bhagwat About Sindhi University ) असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) अमरावतीत म्हणाले.

Mohan Bhagwat
मोहन भागवत
author img

By

Published : Apr 28, 2022, 4:34 PM IST

Updated : Apr 28, 2022, 6:22 PM IST

अमरावती - आपल्या धर्मासोबत जमीनही टिकून राहावी म्हणून काही सिंधी बांधव पाकिस्तानात राहिले तर जमिनी गेल्या तरी आपला धर्म टिकून राहावा म्हणून अनेक सिंधी बांधव भारतात आलेत. भारताच्या विकासात सिंधी समाजाचा अतिशय मोलाचा वाटा आहे. सिंधी संस्कृती आणि भाषा टिकून राहावी यासाठी देशात सिंधी विद्यापीठ व्हावे अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे नाही. देशात निश्चितपणे सिंधी विद्यापीठ व्हावे ( Mohan Bhagwat About Sindhi University ) असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( Mohan Bhagwat ) अमरावतीत म्हणाले.

मोहन भागवत यांची प्रतिक्रिया

कंवरधाम गद्दीनशिनी सोहळा - अमरावती शहरालगत भानखेडा मार्गावर साकारण्यात येत आहे. संत कंवरधाम येथे सिंधी समाजाच्या श्रद्धास्थान असणाऱ्या भव्य ठिकाणचे प्रमुख संत म्हणून संत कंवरराम यांचे पणतू साई राजेशलाल मोरडिया यांचा गद्दीनशिनी सोहळा अर्थात धार्मिक गादीवर विराजमान होण्याचा कार्यक्रम आज आयोजित करण्यातच आला होता. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज आणि अंजनगाव येथील शक्तिपीठाचे जितेंद्रनाथ महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्याला अमरावती शहर आणि जिल्ह्यात सह देशातील विविध भागातून सिंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mohan Bhagwat
मोहन भागवत

समाजाचा दबाव हेच सरकारचे पेट्रोल - सिंधी भाषेचे विद्यापीठ व्हावे यासोबतच अखंड भारत पुन्हा प्रस्थापित व्हावा अशा अनेक इच्छा, भावना समाजाच्या आहेत. या व्यासपीठावर सुद्धा त्या व्यक्त झाल्या. सिंधी विद्यापीठासाठी प्रयत्न करावा अशी विनंती मला आज येथे करण्यात आली. मात्र मी सरकारमधील घटक नाही. हे सरकार असो वा इतर कोणतेही सरकार असो ते केवळ समाजाच्या दबावावरच चालत असते. समाजाचा दबाव हेच सरकारचे पेट्रोल आहे. आपल्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करून घ्यायचा असेल तर या सरकारवर दबाव आणणे, यासाठी प्रयत्न करण्याचे आपल्या सर्व समाजाचे कर्तव्य असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले. आपल्या शब्दात वजन असायला हवे. आपल्यामध्ये एकत्र शक्तीची भावना असायला हवी ही अशी शक्ती आपल्याजवळ असली की कोणतेही सरकार आपल्या चांगल्या कामासाठी नकार देणार नाही, असा विश्वास देखील डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

समाजाला जोडा, माणुसकी ठेवा - या देशात विविध भाषिक समाज राहतो. सर्वच भाषांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सिंधी समाजाचे विद्यापीठ देशात नक्कीच असायला हवे. मात्र आपली जी काही स्वप्न आहेत, त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी आपल्याला सर्व समाजाला एकत्रित जोडणे अत्यंत गरजेचे आहे. आपसात आणि देशातील सर्व समाज बांधवांमध्ये आपुलकी ठेवण्याची नितांत गरज आहे. हिंसेने कोणाचेही भले होणार नाही. ज्यांना हिंसाचार प्रिय आहे अशा समाजाला आता अखेरची घरघर लागली आहे. आपण कायम अहिंसावादी आणि शांतताप्रिय असायला हवे. यासाठीच सर्व समाजाला एकत्रित जोडणे आणि माणुसकी जपणे हे कार्य आपल्या सर्वांना आवर्जून करणे गरजेचे असल्याचा सल्ला देखील डॉ. मोहन भागवत यांनी दिला.

अखंड भारत हे सर्वांचे स्वप्न - शंखराचार्य - अखंड भारत हे देशातील सर्वांचे स्वप्न आहे. आणि हे स्वप्न नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत निश्चितच पूर्ण होणार असा विश्वास जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज यांनी या सोहळ्यात. माझ्या हयातीत अखंड भारत होणार की नाही मला माहिती नाही मात्र अखंड भारताची निर्मिती निश्चितपणे होईल असेही शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणाले.

हेही वाचा - Sharad Pawar Affidavit : कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणी शरद पवारांच्यावतीने जेएन पटेल आयोगापुढे प्रतिज्ञापत्र सादर

Last Updated : Apr 28, 2022, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.