ETV Bharat / state

Rodge Special Food Of Vidarbha : विदर्भात पौष महिन्यात रोडग्याच्या जेवणाला महत्त्व ; असा आखला जातो खास जेवणाचा बेत - Rodge planned in farm and temple

पौष महिन्यात विदर्भात रोडग्याच्या जेवणाला विशेष महत्त्व (Rodge Special Food Of Vidarbha) आहे. रोडगे गव्हाच्या पीठापासून बनविले जातात. रोडग्यांसोबत बटाटे वांग्याच्या रस्त्यांची भाजी कढी आणि तुरीच्या डाळीचे वरण केले जाते. विदर्भात हनुमान जयंतीच्या पर्वावर जवळपास सर्वच हनुमान मंदिरामध्ये रोडगे आणि बटाटे वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद (special food of vidarbha in month of Paush) असतो. रोडग्यांबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊ या.

Rodge Special Food Of Vidarbha
रोडग्याचे जेवण
author img

By

Published : Jan 6, 2023, 12:42 PM IST

विदर्भात पौष महिन्यात रोडग्याचे जेवण

अमरावती : विदर्भाच्या खास खाद्य संस्कृतीत गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणारे रोडगे हे विदर्भातील खवय्यांच्या खास जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय (Rodge Special Food Of Vidarbha) आहे. पौष महिन्यात रोडग्याच्या जेवणाला अत्यंत महत्त्व दिले जात असून विदर्भात भरणाऱ्या विविध यात्रा तसेच मंदिरांमध्ये रोडग्याच्या जेवणाचा खास बेत आखला जातो. शेतात आणि जंगलात देखील रोडगे आणि त्यासोबत आलू वांग्याच्या भाजीचा आस्वाद खवय्ये (special food of vidarbha in month of Paush) घेतात.

रोडगे कसे बनवतात : रोडगे बनविण्यासाठी गव्हाचे पीठ जाडसर दळून आणावे लागते. मीठ टाकून हे पीठ भिजवल्यावर या पिठाचे तेल लावून गोळे केले जातात. या गोळ्यांना वरून तेल लावले जात नाही. गोवऱ्या पेटवून त्याच्या निखाऱ्यात हे कणकेचे गोळे ठेवले जातात. हे गोळे गौऱ्यांच्या निखार्‍यावर ठेवल्यानंतर त्यांना सतत परतावे लागते. रोडगे जळणार नाही, याची काळजी घेतली जाते. हे गोळे निखार्‍यावर वरून शिजले की त्यांना त्याच गोवर यांच्या गरम राखेत दाबून ठेवतात. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर त्यांना बाहेर काढल्यावर कपड्याने पुसून त्याचे तुकडे केल्या जाते. हे रोडगे खास जेवणात वाढल्या जातात.

रोडग्यासोबत वांगे बटाट्याची भाजी : रोडग्यांसोबत बटाटे वांग्याच्या रस्त्यांची भाजी कढी आणि तुरीच्या डाळीचे वरण वाढले जाते. बटाट्या वांग्याच्या खास तर्रीच्या भाजीसोबतच तूप टाकलेल्या तुरीच्या डाळीच्या वरणाशी देखील रोडगे अतिशय चविष्ट (Special Food Of Vidarbha) लागतात. रोडग्याचे जेवण केल्यावर भरपूर तहान लागते रोडग्याचे जेवण करणारा व्यक्ती जेवण झाल्यावर बराच वेळापर्यंत भरपूर पाणी पितो. रोडग्यांचा चुरा करून त्यावर गूळ आणि तूप टाकून खास लाडू देखील तयार केले जातात. अनेकजण मंदिरात नवस फेडण्यासाठी रोडग्यांचे जेवण देतात. वऱ्हाडात रोडग्याच्या जेवणावर सर्वच जण आनंदाने ताव मारतात, असे श्री शिवाजी कला महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक सुजाता झाडे रोडग्यांसंदर्भात ईटीव्ही भारतशी संवाद साधताना (Rodge planned in farm and temple) म्हणाल्या.

रोडग्यांचे प्रकार : विदर्भातील लोकांना जेवणात सर्वाधिक आवडीचे असणाऱ्या रोडग्यांचे बिट्टया आणि पानगे असे दोन वेगळे प्रकार देखील आहेत. गव्हाच्या जाडसर पिठाचे गोळे हे गौवऱ्यांमध्ये भाजण्याऐवजी तेलात तळल्या जातात या प्रकाराला बिट्टया असे म्हटले जाते. रोडगे अमरावती अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केल्या जातात. रोडग्यांसोबतच झटपट पंगती उरकाव्या यासाठी अनेक जण रोडग्यान ऐवजी बिट्टया बनवतात. विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात रोडगे आणि बिट्टयांपेक्षा पानगे या प्रकाराला अधिक आवडीने खाल्ले जाते. पानग्यामध्ये जाडसर पोळी लाटून तिला तेल लावून तिचा गोळा तयार केला जातो. हा प्रकार ज्या व्यक्तींची दात बळकट नाही किंवा म्हातारे व्यक्ती यांना सहज खाता येऊ (Rodge planned in month of Paush) शकतो.

हनुमान जयंती, शिवरात्रीला महत्त्व : विदर्भात हनुमान जयंतीच्या पर्वावर जवळपास सर्वच हनुमान मंदिरामध्ये रोडगे आणि बटाटे वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद असतो. शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अनेक शिवमंदिरात रोडगे आणि बटाटे वांग्याच्या भाजीचे जेवण करूनच अनेक भाविक उपास सोडतात. तसेच शहराबाहेर असणाऱ्या अनेक जागृत म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या हनुमान मंदिर परिसरात नेहमीच रोडग्यांचे जेवण प्रसाद म्हणून ठेवले (month of Paush) जाते.

मटणासोबतही खातात रोडगे : रोडगे आणि बटाटे वांग्याची भाजी ही खवय्यांची खास पसंती असली, तरी अनेकजण मटणासोबत देखील रोडग्यांचा बेत आखतात. अमरावती जिल्ह्यात बहिरम यात्रेत मिळणाऱ्या हंडीतील मटणासोबत अनेकजण लगतच्या जंगलात गोवऱ्यांवर रोडगे तयार करून रोडगे आणि मटणावर ताव मारतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.