अमरावती - विदर्भाच काश्मीर म्हणून ओळख असलेल्या चिखलदरा या पर्यटन नगरीमध्ये अनेक पर्यटन स्थळ सामावलेले आहेत. चिखलदरामधील देवी पॉट लगत असलेला शक्कर तलाव हा पर्यटकांसाठी आवडता पॉईंट आहे. या तलावावर पर्यटन हे मोठ्या प्रमाणावर बोटिंग करत असताना, सोबतच हा तलाव चिखलदरा शहरातील पाणी पातळी वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असतो. पावसाळा आणि हिवाळ्यात तुडुंब भरलेला हा तलाव उन्हाळ्यात मात्र कोरडा पडून जातो. कारण मागील अनेक वर्षापासून हा तलावाला गळती लागलेली होती. परंतु आता शक्कर तलावांचे लिकेज दुरुस्तीचे काम हे जोरात सुरु झाले आहे. त्यामुळे आगमी काळात उन्हाळ्यात देखील या तलावात पाणी जमा राहण्याची शक्यता आहे.
पर्यटकांना भूरळ घालणारा शक्कर तलाव -
या तलावाच्या लिकेज दुरुस्तीचे काम हे मागील चार महिन्यापासून सुरू असून ते काम आता अंतिम टप्यात आले आहे. तलावातील लिकेज काढण्यासाठी या तलावात ठिकठिकाणी तबल जेसेबीच्या साह्याने १८ फूट खोल होल करुन त्यात सिमेंट ग्रीडिंग केले जात आहे. चिखलदरासाठी वरदार असलेला शक्कर तलाव हा पावसाळ्यात व हिवाळ्यात पर्यटकांना भूरळ घालत असतो. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. त्यामुळे या तलावाशेजारी बसून पर्यटक थंड हवेचा आनंद घेत असतात.
हेही वाचा - '50 टक्के नफा धरून केंद्राने भाव काढले म्हणतात ती फसवेगिरी' - ना. बच्चू कडू