अमरावती - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि. 23 जुलै)रोजी पहाटेपासूनच जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 55.5 मीमी इतका पाऊस झाला आहे. सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणासह जिल्ह्यातील सहा प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग होत असून अपर्वता धरणाची सर्व दारे 60 सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत.
अप्पर वर्धा धरणापासून पाण्याचा विसर्ग - अप्पर वर्धा धरणातील पाणीसाठा 85.31% पर्यंत पोहोचला आहे . शहानूर मध्यम प्रकल्पाच्या चार दरवाजांमधून 14.20 घनमीटर प्रतिसेकंद चंद्रभागा प्रकल्पाच्या तीन दरवाजांमधून 11.87 पूर्णा प्रकल्पाच्या दोन दरवाज्यांमधून 12.34 सपन प्रकल्पाच्या चार दरवाजांमधून 16.64 घनमीटर प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे.
सरासरीच्या 122.7% पाऊस - जिल्ह्यात पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या 122.7% पाऊस झाला आहे. गेल्या १ जून पासून आतापर्यंत 429 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी आज तारखेपर्यंत 425 मीमी. म्हणजे 111 टक्के पाऊस पडला होता.
हेही वाचा - अजबच ! बियरबारच्या परवान्यासाठी स्वागत कमान बांधून देण्याची अट; विरवडे ग्रामपंचायतीचा कारभार